शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
2
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
3
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
4
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
5
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
6
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
7
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
8
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
9
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
10
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
11
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
12
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
13
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
14
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
15
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
16
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
17
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
18
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
19
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
20
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

रघुनाथ भरसट, उगलमुगले यांना पोलीसपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 1:52 AM

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह विभागाच्या वतीने पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्टÑपतिपदक जाहीर करण्यात आले. नाशिक ग्रामीण पोलीस दलातील उपनिरीक्षक रघुनाथ भरसट व सहायक उपनिरीक्षक दत्तात्रय उगलमुगले यांचा त्यात समावेश आहे.

नाशिक : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह विभागाच्या वतीने पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्टÑपतिपदक जाहीर करण्यात आले. नाशिक ग्रामीण पोलीस दलातील उपनिरीक्षक रघुनाथ भरसट व सहायक उपनिरीक्षक दत्तात्रय उगलमुगले यांचा त्यात समावेश आहे.नाशिक ग्रामीण पोलीस दलात दहशतवाद विरोधी कक्षामध्ये कार्यरत असलेले भरसट यांना विशेष पोलीसपदक जाहीर झाले. हरसूल हरणटेकडीचे भरसट हे २२ आॅगस्ट १९८९ साली नाशिक ग्रामीणमध्ये पोलीस शिपाई म्हणून भरती झाले. त्यानंतर त्यांनी कळवण, हरसूल, पिंपळगाव बसवंत, दिंडोरी,अभोणा, पेठ या आदिवासी भागातील पोलीस ठाण्यांमध्ये सेवा बजावली आहे.२०१३ साली पोलीस खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक परीक्षेमध्ये ते उत्तीर्ण झाले. त्यांना सेवाकाळात १५० रिवॉर्ड मिळाले आहेत. आदिवासी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना विशेष पोलीस पदक जाहीर झाले आहे. त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले उगलमुगले यांनादेखील पोलीस पदक जाहीर झाले आहे. दिंडोरी तालुक्यातील तळेगाव येथील रहिवासी असलेले उगलमुगले मार्च १९८९ साली नाशिक ग्रामीण पोलीस दलात शिपाई म्हणून भरती झाले.२००४ सालापर्यंत उगलमुगले यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात कर्तव्य बजावले. त्यानंतर नाशिक तालुका पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा आणि सध्या वाचक शाखेमध्ये ते सेवा बजावत आहेत. उगलमुगले यांनी आतापर्यंत ४८० रिवॉर्ड मिळविले आहेत.राज्यातील मानकरीस्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे देण्यात येणाऱ्या राष्टÑपती पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली असून, महाराष्ट्रातील ४६ पोलिसांना या पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. पोलीस दलामध्ये उत्कृष्ट सेवेकरिता मुंबईतील सहाय्यक आयुक्त मिलिंद खेतले यांना गौरविण्यात आले. -वृत्त/पान ७पुणे पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र शिवाजी जाधव, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक राजाराम रामराव पाटील, पुण्यातील राज्य राखीव पोलीस दल गट-२ चे हरिश्चंद्र गोपाळ काळे, कोल्हापूरचे जिल्हा विशेष शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक मारुती कलप्पा सूर्यवंशी यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. तर प्रशंसनीय सेवेकरिता राज्य दहशतवाद विभागाचे मुंबईतील पोलीस उपायुक्त विक्रम नंदकुमार देशमाने, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपायुक्त नेताजी शेकुंबर भोपळे, आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त किरण पाटील, डोंगरी विभागाचे सहायक आयुक्त अविनाश धर्माधिकारी, साकीनाका पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक अब्दुल शेख, पायधूनी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक प्रकाश कदम, गुन्हे शाखेतील हवालदार गणेश गोरेगावकर आणि लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यातील हवालदार श्रीरंग सावरडे यांचा समावेश आहे.पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयPoliceपोलिस