शुक्रवार (दि.१०) शेख कुटुंबाने गणपती मूर्तीची स्थापना केल्यानंतर पुरणगावचे ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत सपत्नीक आरती केली व गुरुवारी (दि.१६) शेख कुटुंबाने सलीम काझी, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र ठोंबरे व श्रावण ठोंबरे, खालेदा सलीम काझी, राहुल वैराळ, रहीम शेख, जरीना रहीम शेख, सादीयाँ रहीम शेख, आयात रहीम शेख, आमन रहीम शेख यांच्या उपस्थितीत सत्यनारायणाची पूजादेखील केली.
'मजहब नहीं सिखाता, आपसमे बैर रखना' याप्रमाणे शेख कुटुंबाने यापूर्वीही लक्ष्मी देवीच्या जागरण गोंधळाचे आयोजन करून अखंड हरिनाम सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायणास बसलेल्या भाविकांबरोबर समस्त पुरणगावकरांना जेवणाची मिष्टान्न पंगतही दिली होती.
(१६ पुरणगाव गणपती)
पुरणगाव येथील रहिम शेख यांच्या घरात सत्यनारायण पूजेप्रसंगी उपस्थित सलीम काझी, मच्छिंद्र ठोंबरे, श्रावण ठोंबरे, खालेदा सलीम काझी, राहुल वैराळ आदी.
160921\16nsk_41_16092021_13.jpg
पुरणगाव येथील रहिम शेख यांच्या घरात सत्यनारायण पूजेप्रसंगी उपस्थित सलीम काझी, मंच्छिद्र ठोंबरे, श्रावण ठोंबरे, खालेदा सलीम काझी, राहुल वैराळ आदी.