शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
3
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
8
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
9
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
10
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
11
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
12
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
13
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
14
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
15
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
16
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
17
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
18
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
19
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

अनुभवला स्वरांचा 'तेजोनिधी लोहगोल'; प्रमोद महाजन उद्यानात रंगली राहुल देशपांडे यांची मैफल 

By धनंजय रिसोडकर | Published: October 27, 2022 12:32 PM

लोकमत न्यूज नेटवर्क  नाशिक : अलबेला सजन आयो री.. दिल की तपीश है आज आफताब' पासून 'तेजोनिधी लोहगोल, भास्कर ...

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : अलबेला सजन आयो री.. दिल की तपीश है आज आफताब' पासून 'तेजोनिधी लोहगोल, भास्कर हे गगनराज ' अशा रागदारीवर आधारित चीजांसह ' कानडा राजा पंढरीचा आणि तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल' अशा भक्तीगीतांनी नाशिककरांच्या दीपोत्सवाच्या पर्वाची सुरेल सांगता झाली.

आमदार देवयानी फरांदे यांच्या वतीनेआयोजित मैफलीसाठी प्रमोद महाजन उद्यान ओसंडून वहात होते. पारंपरिक पेहरावत आलेल्या रसिक महिला आणि पुरुषांनी महाजन उद्यानाचा एका टोकापासून ते पार खेळण्यांपर्यंतच्या दुसऱ्या टोकापर्यंत मैदान रसिकांनी फुलले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी राहुल देशपांडे यांनी वसंत बुखारी या दोन रागांचा संगमातून साकारलेली 'कित हो गये बनवारी' ही चीज सादर केली. रागदारी संगीतामधील स्वरांची ताकत त्यांनी अलबेला सजन आयो री मधून दाखवून दिले. त्याशिवाय कट्यार काळजात घुसली चित्रपटातील तेजो निधी लोहगोल तसेच तुजं मागतो मी आता या गीताच्या चालीवरील हिंदी रचना तसेच छोटासा साया था या हिंदी गाण्यावरील राग सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात राम राम जप करी सदा हे भजन तसेच तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल आणि कानडा राजा पंढरीचा यासह विठ्ठल नामाचा गजर करीत कार्यक्रमाची सांगता झाली. त्यांना तबल्यावर निखिल फाटक संवादिनी व मिलिंद कुलकर्णी, कीबोर्डवर अमन वरखेडकर आणि साईड रिदम रोहन वनगे यांनी साथसंगत केली. यावेळी आमदार देवयानी फरांदे यांनी मनोगत व्यक्त करताना नाशिकच्या जिल्हा क्रीडा संकुलासह, अभिनव भारत मंदिर स्मारकाची  उभारणी तसेच प्रमोद महाजन उद्यान, तरणतलावांचे नूतनीकरण अशा विविध प्रकल्पांची माहिती दिली. कार्यक्रमाला सर्वच क्षेत्रातील मान्यवर आणि रसिक प्रचंड संख्येने उपस्थित होते.