फटाक्यांची आतषबाजी, कोरोना नियमांचे काटेकोर पालन :
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यात राजकीयदृष्ट्या प्रबळ समजल्या जाणाऱ्या हरसूल ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राहुल शार्दूल यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सरपंच सविता गावीत यांनी काम पाहिले.
हरसूल (ता. त्र्यंबकेश्वर) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रोटेशन पद्धतीमुळे उपसरपंच नितीन देवरगावकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर सदस्यांच्या एकमताने नवनिर्वाचित उपसरपंच राहुल शार्दूल यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड करण्यात आली. हरसूलच्या सरपंच तसेच निवडणूक निर्णय अधिकारी सविता भगवान गावीत तसेच सचिव किशोर मराठे यांनी काम पाहात निवडीची घोषणा केली.
यावेळी आमदार हिरामण खोसकर, विनायक माळेकर, मिथुन राऊत, नितीन लाखन, लक्ष्मण मेघे, हिरामण गावीत, गोकुळ बत्तासे, विठ्ठल भोये, बाबा शेंडे, भाऊराज धनगर, अशोक लांघे, आखलाख शेख, स्वप्नील शार्दूल, संदीप शार्दूल, दत्ता व्यवहारे, अनिल बोरसे, कौशल्या लहारे, परवेज शेख, शिवाजी कोथमिरे, सुरेश गायकवाड, जयराम भुसारे, रघुनाथ गांगोडे, विष्णू बेंडकोळी, प्रतिभा लांघे, रंजना कोथमिरे, संगीता गावीत, संजय देशमुख, तुळशीराम देशमुख, भारती व्यवहारे, प्रकाश मेढे, श्रीमती पुष्पा मेढे, रवींद्र देवरगावकर, कांतीलाल लोखंडे आदी उपस्थित होते.
कोट...
हरसूल ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी एकमताने बिनविरोध उपसरपंचपदी निवडून दिले आहे. आगामी काळात त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता जनतेच्या विविध विकासावर भर देणार असून समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध राहील.
- राहुल शार्दूल, नवनिर्वाचित उपसरपंच.
हरसूल ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झालेल्या राहुल शार्दूल यांचा सत्कार करताना मान्यवर.
250821\img-20210825-wa0021.jpg
छायाचित्र : हरसूल : नवनिर्वाचित उपसरपचपदी निवड झालेल्या राहुल शार्दूल यांचा सत्कार करतांना मान्यवर.