भगूर : राहुरी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान सरपंच संगीता संपत घुगे यांची पुन्हा थेट जनतेतून बहुमताने निवड झाली असून, पाच सदस्यांची बिनविरोध सर्वसंमतीने निवड झाली.रविवार राहुरी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. त्यात थेट जनतेतून सरपंचपदासाठी चार उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यामध्ये विद्यमान महिला सरपंच म्हणून पुन्हा थेट जनतेतून सरपंचपदी संगीता संपत घुगे २७२ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार प्रवीण सांगळे यांचा २५० मतांनी पराभव केला. तर सुभाष आव्हाड हे १८८ मते मिळून तिसऱ्या स्थानावर गेले. या निवडणुकीत प्रभाग १अ मधून भाऊसाहेब आव्हाड, ब मधून अनिता आव्हाड, प्रभाग २ ब मधून संगीता घुगे, प्रभाग ३ अ मधून अरुण निरभवणे, ब मधून मनीषा घुगे यांची सर्व संमतीने बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती. यात प्रभाग २ अ या एका जागेसाठी लढत झाली.त्यामध्ये सुभाष आव्हाड विजयी झाले तर अजून एक सदस्य नियुक्ती नंतरच्या काळात होणार आहे. यावेळी नूतन सरपंच संगीता घुगे यांनी सांगितले की, आगामी काळात लवकरच गावात घरकुल योजना राबवून गरिबांना निवारा देण्यासाठी आपला प्रयत्न राहील.राहुरी ग्रामपंचायतीत एक सरपंच आणि सहा सदस्य निवडून आल्याने नूतन पदाधिकाऱ्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत मदन घुगे, विठ्ठल निरभवणे, किसन घुगे, अनिल गोडसे, ऋषिकेश घुगे, वंचित आव्हाड, अशोक कराड, अंबादास घुगे, धनंजय घुगे, संपतराव घुगे आदी उपस्थित होते.
राहुरी ग्रामपंचायतीत महिला राज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:15 AM