नाशिक - पंधरवड्यापूर्वी दरणकाठावरील राहुरीमध्ये जेरबंद झालेल्या नर बिबट्याची रवानगी अखेर बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बुधवारी(दि.19) करण्यात आली. तसेच यापूर्वी गांधी उद्यानात पाठविलेल्या पाचपैकी 2 माद्या आणि एक अल्पवयीन नराला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याचा आदेशदेखील देण्यात आला आहे.
दारणा काठावरील बिबट्याचे वाढते कमी करण्यासाठी पश्चिम वन विभागाच्या नाशिक परिक्षेत्राच्या रेस्क्यू पथकाने गेल्या दोन महिन्यांपासून युद्धपातळीवर बिबटे जेरबंद करण्याची मोहीम हाती घेत तब्बल अकरा बिबटे दारणानदीच्या काठालगतच्या गावांमधून जेरबंद केले. त्यापैकी एकूण सहा बिबट्यांना बोरिवलीला पाठविण्यात आले होते त्यामध्ये काही माद्या व एका अल्पवयीन नर बिबट्याचा ही समावेश आहे दरम्यान हैदराबाद येथील सीसीएमबी इंद्रा कडून प्राप्त झालेल्या बिबट्याच्या लाळेचे नमुने नुसार मानवी हल्ले करणारा धारणा काठावरील बिबट्या नर असल्याचा निष्कर्ष वन विभागाला प्राप्त झाला आहे त्यानुसार वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यापूर्वी धारणा काठावर लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झालेल्या माद्यांची जिल्ह्याबाहेर नैसर्गिक अधिवासात मुक्तता करण्याचे आदेश काढले आहे. त्यामुळे कायद्यात असलेल्या दोन्ही माद्या व एका अल्पवयीन नर बिबट्याची सुटका होण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे.पंधरवड्यापूर्वी धारणा काठावरील राहुरी गावांमध्ये एक प्रौढ नर जेरबंद झाला होता गेल्या पाच तारखेपासून हा नर बिबट्या नाशिक वन विभागाचा पाहुणचार घेत होता दरम्यान या बिबट्याचा मुक्काम आता बोरी वरील हलविण्यात आल्याची माहिती वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी दिली. मानवी हल्ले करणारा दारणा काठावरील बिबट्यांना असल्याचे समोर आल्याने आतापर्यंत पिंजऱ्यात जेरबंद झालेल्या नर बिबट्यांची सुटका तूर्तास होणार नाही.