नाशिक : शहरात अवैध धंदे पुन्हा सुरू झाल्याचे आयुक्तालयातील विविध पोलीस ठाणे हद्दीत टाकलेल्या छाप्यांवरून समोर आले आहे़ पोलिसांनी चार विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये बारा जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे़ इंदिरानगर परिसरातील जुगार अड्ड्यांवरील छाप्यात कांचन देवराम साळवे, भद्रकाली परिसरातील जुगार अड्ड्यावरील छाप्यात अब्दुल खालीद रहेमानसह तीन, पंचवटी परिसरातील जुगार अड्ड्यावरील छाप्यात संतोष गंगाराम जाधवसह सहा, तर अंबड परिसरातील जुगार अड्ड्यावरील छाप्यात आबिद बशीर शेखसह दोन जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे़ या जुगाऱ्यांवर संबंधित पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
शहरात जुगार अड्ड्यांवर छापे
By admin | Published: February 20, 2016 11:01 PM