मालेगाव : तालुक्यातील चंदनपुरी शिवारात पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून ५ लाख ७८ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, २७ जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी किल्ला पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदनपुरी शिवारात शेतातील एका घरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी बुधवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास छापा टाकून ही कारवाई केली. विश्वनाथ सिद्धेश खैरनार यांच्या शेतात पिंटू अशोक अहिरे (३६, रा. मोतीबाग नाका) हा जुगार अड्डा चालवत असल्याचे आढळून आले. जुगाऱ्यांच्या ताब्यातून भ्रमणध्वनी संच, दुचाकी व ३ लाख २८ हजार ७२० रोख रक्कम असा एकूण ५ लाख ७८ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस कर्मचारी संतोष उगले यांनी फिर्याद दिली. पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जयसिंग राजपत, पोलीस कर्मचारी अरुण बन्से, किल्ला पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिगंबर भदाणे, उपनिरीक्षक बाळासाहेब खरगे, हवालदार सूर्यवंशी, पोलीस नाईक बागुल, पोलीस कर्मचारी नितीन पांढरे, पप्पू अहिरे यांचा पथकात समावेश होता.
--------------
यांना घेतले ताब्यात
पाेलिसांनी टाकलेल्या छाप्यात एकबाल रियाज अहमद (४२, रा. उमराबाग), राकेश आनंदा शिंदे (४५, रा. सटाणा नाका), राजेंद्र फकिरा डांगचे (५४, रा. संगमेश्वर), सलीम अलाउद्दीन शेख (५१, रा. आझादनगर), दत्तू जमलू जाधव (५१, रा. संगमेश्वर), अतिक अहमद सुबराती (५०, रा. अब्दुल खलील पार्क), मोहन हरी पवार (३८, रा. सोयगाव), रूपेश भीमराव शिरसाठ (४८, रा. माेतीबाग नाका), जुबेर शफीक अहमद (३५, रा. अयाजनगर), पिंटू अशोक अहिरे (३६,रा. मोतीबाग नाका), जमिल अहमद इद्रीस (६०, रा. रविवार पेठ), शेख अब्दुल सत्तार (६४, रा. कमालपुरा), अतिक अहमद अब्दुल रहेमान (५४, रा. रौनकाबाद), अय्युब साकीर खान (५३, रा. खालीकनगर), अशोक बाबुलाल जगताप (४६, रा. कॅम्प), अफरोज शेख रमजान (५२, रा. गुलशननगर), मोहंमद हारुण शाबान (५०, रा. फरशीनगर), मोबीन मोहंमद इस्माईल (३५, रा. इस्लामपुरा), शेख गाझीब इलियास (३४, रा. आझादनगर), किसन विलाससिंग चौधरी (४०, रा. सटाणा नाका), कमलेश पांडुरंग सूर्यवंशी (३५, रा. संगमेश्वर), शेख रऊफ रशीद (३५, रा. चमननगर) यांना ताब्यात घेतले.