मनमाड : शिर्डी मनमाड काकिनाडा एक्सप्रेसच्या आरक्षीत बोगीत अज्ञात चार जणांनी प्रवाशांना धाक दाखउन एक लाख ३२ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून धावत्या गाडीतील लुटमारीच्या घटनांमधे वाढ झाली असून प्रवाशांची सुरक्षीतता रामभरोसे असल्याने प्रवाशी वर्गामधे घबराट निर्माण झाली आहे.गाडी क्रमांक १२२०५ शिर्डी मनमाड काकीनाडा एक्सप्रेस ही गाडी गुरूवारी रात्री मनमाड रेल्वे स्थानकावरून रवाना झाली.या गाडीने अनकाई स्टेशन सोडल्यानंतर आरक्षीत एस-८ बोगीमधील २२ ते ३० वयोगटातील तीन ते चार अज्ञात इसमांनी प्रवाशांना धाक दाखवत व मारहाण करत लुटमार सुरू केली. प्रवाशांच्या खिशातील पैसे, महिला प्रवाशांचे दागीने मिळेल ते हिसकाउन घेतले.अचानक घडलेल्या या प्रकारामुळे लहान मुले व महिला प्रवाशांनी आरडाओरडा केला. काही प्रवाशांनी या चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.प्रवाशांनी विरोध केल्याचे पाहून चोरट्यांनी नगरसूल रेल्वे स्थानका दरम्यान साखळी ओढली व गाडी हळू झाल्यानंतर खाली उतरून पळ काढला.ही गाडी औरंगाबाद येथे पोहचल्यानंतर एस-८ बोगीतील प्रवाशी श्रीमती होनानी मंगतराम(४३) रा: दुला शहर ता: प. गोदावरी आंध्रप्रदेश यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहमार्ग पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एक सोन्याची चैन, २४ ग्रॅमचे मंगळसुत्र व रोख रक्कम असा १ लाख ३२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.सदरचा गुन्हा आज मनमाड लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून स.पो.नि. अर्चना क्षिरसागर या अधिक तपास करत आहे.
काकिनाडा एक्सप्रेसमधे लुटमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 6:48 PM
शिर्डी मनमाड काकिनाडा एक्सप्रेसच्या आरक्षीत बोगीत अज्ञात चार जणांनी प्रवाशांना धाक दाखउन एक लाख ३२ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून धावत्या गाडीतील लुटमारीच्या घटनांमधे वाढ झाली असून प्रवाशांची सुरक्षीतता रामभरोसे असल्याने प्रवाशी वर्गामधे घबराट निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देमनमाड : रेल्वे प्रवाशांची सुरक्षीतता रामभरोसे