मालेगाव : शहरातील सेंट्रल चित्रपटगृहाजवळ सुरू असलेल्या जुगार अड्डयावर विशेष पोलीस पथकाने छापा टाकून १३ जुगाऱ्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांना जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार खात्री करून पथकाला छापा टाकण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या. पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक आर. के. घुगे यांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून अर्शद हारुण शेख, करीम नबी सय्यद, चेतन दीपक मुंडे, खालिद मोहंमद शाह, दिनेश अरुण ढोले, शरीफ मोहंमद मन्सुरी, विनोद बबन माळी, जाकीर युसूफ खान, नागू अंबर चव्हाण, आमिन ख्वाजा सय्यद, सुनील काशीनाथ बच्छाव, किसन बनारसी चटोले व विजय रामदास पाटील या जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून ४० हजारांचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस कर्मचारी वसंत महाले, भूषण खैरनार, प्रकाश बनकर, पंकज भोये, संदीप राठोड आदींनी केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालेगावी जुगार अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:25 AM