नाशिक : पंजाब नॅशनल बँकेतील हजारो कोटींचा घोटाळा करणाºया नीरव मोदी व चोकसी यांच्या हिºयांच्या ब्रॅण्डच्या दागिन्यांची विक्री करणाºया व्यावसायिक आस्थापनांवर देशभरात छापे पडत असताना बुधवारी (दि. २१) रात्री नाशकातील काही सराफी व्यावसायिकांच्या दुकानात आयकर खात्याने छापे टाकल्याचे वृत्त आहे. कॅनडा कॉर्नर, गंगापूर नाका, महात्मानगर परिसरातील व्यावसायिकांवर हे छापे टाकण्यात आले. या व्यावसायिकांकडे गीतांजली व विविध ब्रॅण्डच्या दागिन्यांची फ्रेंचाईसी असल्याने छापे टाकण्यात आल्याची चर्चा आहे़ दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास प्राप्तिकर विभागाने हा छापा टाकला़ याबरोबरच शहरातील आणखीही सराफी पेढ्यांवर छापा टाकण्यात आल्याची चर्चा आहे़ रात्री उशिरापर्यंत कॅनडा कॉर्नर व महात्मानगर परिसरातील सराफी दुकानांमध्ये अधिकाºयांकडून चौकशी सुरू होती़ यामुळे ही दुकाने रात्री उशिरापर्यंत अर्धवट स्थितीत उघडी होती. दुकानाबाहेर सुरक्षारक्षक तैनात होते़ याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नव्हती़ नीरव मोदीच्या घोटाळ्यामध्ये स्थानिक व्यावसायिकांचाही संबंध आहे का याची चौकशी केली जात असल्याची चर्चा आहे़
सराफी व्यावसायिकांवर नाशिकमध्ये छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 1:54 AM