घोटी : इगतपुरी रेल्वे स्थानकाला केंद्राकडून विविध विकासकामांकरीता भरगच्च निधी मिळाला आहे. मात्र या विकास कामांतून ठेकेदाराची अधिकाऱ्यांच्या संगनमताने चांदी होत असल्याचे समोर येत असून हा विकास इगतपुरीतील नागरिकांच्या मुळावर उठत असल्याची संतप्त भावना नागरिकांनी बोलून दाखविली आहे. या विकास कामांनी शहरातील मुंबई जुना आग्रा महामार्गावर थेट अतिक्र मण करून वाहतूक व्यवस्थेचा बट्यबोळ केला जात आहे. या कामांमुळे महामार्ग नियमांचे उल्लंघन होत असून शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडून जाणार आहे.इगतपुरी रेल्वे स्थानकावर व मुख्य गेटचे नुतनीकरण व सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. मात्र रेल्वेच्या आय. डब्लु विभागाच्या अधिकाºयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची कुठलीही परवानगी न घेता मुख्य गेटच्या दोन्ही बाजुला शंभर मीटर लांब व सहा फुट रु ंद अशी संरक्षक भिंत जुन्या मुंबई आग्रा मार्गावर अतिक्र मण करून बांधण्याचे काम सुरु आहे. यामुळे भविष्यात वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होऊन वाहतुक खोळंब्याला नागरिकांना सामना करावा लागणार आहे.मुळातच जुना मुंबई आग्रा महामार्ग अरूंद असल्यामुळे येथे रोजच वाहतुकीचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे.शहरात हा एकमेव मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावरून नाशिक, कसारा, शाळा, महाविद्यालये, भाजी मार्केट, ग्रामिण रु ग्णालय, बस स्थानक आदी ठिकाणी जाण्यासाठी पादचारी व वाहनांची येथुन रोज गर्दी होत असते. रेल्वे प्रशासनाच्या या अतिक्र मणामुळे हा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. यावर मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मौन बागळुन आहे.याबाबात लोकप्रतिनिधींनी यात लक्ष्य घालण्याची गरज असुन हा प्रश्न त्वरीत मार्गी लावावा अशी मागणी नागरीकांमधुन होत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी विलास आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही सदर ठेकेदारास नोटीस बजवणार असुन हा रस्ता आम्ही इगतपुरी नगरपरिषदेकडे हस्तातंरीत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदरचा रस्ता आमच्याकडे हस्तातंरीत करण्याच्या गोष्टी गेल्या दहा वर्षापासुन तोंडी चालु असुन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कागदोपत्री मात्र काहिच करीत नसल्याचे सांगितले.इगतपुरी रेल्वे स्थानकावर मुंबईला जाणाºया व मुंबईहुन येणाºया सर्व एक्सप्रेसला थांबा असल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होत असते. रेल्वे स्थानकात गाडी आल्यावर प्रवाशांची गर्दी बाहेर येते. परिणामी रिक्षा व टॅक्सीने जाण्यासाठी येथे वाहतुकोंडी होऊन आपआपसात हमरी तुमरी होत असल्याचे चित्र रोजच पाहावयास मिळते. त्यातच हे शंभर मीटर भिंतीचे अतिक्र मण झाल्यास येथे रोजच भांडणे व वाहतुक कोंडी पाहावयास मिळेल.प्रतिक्र ीया....१) इगतपुरी रेल्वे स्थानकाचे नव्याने बांधकाम मोठया जोमाने सुरु आहे. मात्र येणार्या व जाणार्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने कोणत्याही प्रकारची सुविधा केलीली नसल्याने भविष्यात या ठिकाणी फार मोठी वाहतुक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.-- रमेश शिंदे, स्थानिक रहीवाशी.२) काम विभाग व नगर परिषदेच्या प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे शहरातुन जाणारा जुना मुंबई-आग्रा महामार्गावर रेल्वे प्रशासनाला रस्यावर अतिक्र मण करण्याची खुप मोठी संधी मिळाली असुन बांधकाम झाल्यावर मात्र चिरीमिरीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी जागे होतील.याचा त्रास मात्र प्रवाशीसह स्थानिकांना भोगावा लागणार आहे.- रफीक सय्यद, नागरिक.
जुन्या मुंबई आग्रा महामार्गावर रेल्वेचे अतिक्र मण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 6:15 PM
घोटी : इगतपुरी रेल्वे स्थानकाला केंद्राकडून विविध विकासकामांकरीता भरगच्च निधी मिळाला आहे. मात्र या विकास कामांतून ठेकेदाराची अधिकाऱ्यांच्या संगनमताने चांदी होत असल्याचे समोर येत असून हा विकास इगतपुरीतील नागरिकांच्या मुळावर उठत असल्याची संतप्त भावना नागरिकांनी बोलून दाखविली आहे. या विकास कामांनी शहरातील मुंबई जुना आग्रा महामार्गावर थेट अतिक्र मण करून वाहतूक व्यवस्थेचा बट्यबोळ केला जात आहे. या कामांमुळे महामार्ग नियमांचे उल्लंघन होत असून शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडून जाणार आहे.
ठळक मुद्देइगतपुरी : नियमांचे केले उल्लंघन ; वाहतुकीस होणार मोठा अडथळा