नाशिकरोड : रविवारचा मुसळधार पाऊस व पूरपरिस्थितीमुळे रेल्वे वाहतूक ठप्प होऊन नाशिकरोड रेल्वेस्थानकावर अडकून पडलेल्या हजारो प्रवाशांना परिसरातील नागरिक व मित्रमंडळांनी एकत्र येऊन त्यांच्या भोजनाची तसेच शुद्ध पाण्याची व्यवस्था केली. या प्रवाशांना रात्र रेल्वेस्थानकातच काढावी लागली. रविवारी सकाळपासून एकही रेल्वे अप-डाउन झाली नाही. परिणामी हजारो प्रवासी दिवसभर रेल्वेस्थानकावरच अडकून पडले. पावसामुळे परिसरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद असल्याने प्रवाशांना खाण्या-पिण्याचा संकटाचा सामना करावा लागला. ही बाब हेरून अन्नपुण्य ग्रुप, अखिल भारतीय परमेष्ठी फाउंडेशन, भारतीय जैन संघटना, जैन स्थानकवासी श्रावक संघ, नाशिकरोड गुरुद्वारा समिती आदींच्या वतीने सुमारे पाच हजार नागरिकांना भोजन व पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले.यावेळी शांतीलाल अलिझाड, मिठ्ठूलालजी चोरडिया, सुरेश चोरडिया, मांगीलाल धाडीवाल, सतीश मंडलेचा, अशोक बुगडी, मिलिंद चोरडिया, शांताराम घंटे, गौरव बाफणा, अमोल संघवी, कन्नू ताजणे, संदीप ललवाणी आदींनी पुढाकार घेतला.
नाशिकरोडला रेल्वेच्या प्रवाशांची भूक भागविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 1:30 AM