मनमाड : मुंबई व कोकण विभागांमध्ये जोरदार अतिवृष्टी झाल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून गुरुवारी काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर अनेक गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. प्रवाशांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मनमाड रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक तीनवर मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. रद्द करण्यात आलेल्या प्रवासी गाड्यांमध्ये पंचवटी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, पवन एक्सप्रेस यांसह अन्य गाड्यांचा समावेश आहे. मंगला एक्सप्रेस मनमाड दौंडमार्गे धावत असून अनेक गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या आठ ते दहा तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. (२२ मनमाड)
पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 4:11 AM