शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

सिन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 3:02 PM

सिन्नर : तालुक्यातील दापूर येथे व परिसरात सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतातील तसेच आदिवासी वस्तीवर राहणाऱ्या ...

सिन्नर : तालुक्यातील दापूर येथे व परिसरात सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतातील तसेच आदिवासी वस्तीवर राहणाऱ्या घरांचे पत्रे उडाले असून, काही भागांत विजेचे खांब उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान, सोमवारी (दि. ३१) सकाळी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला.शिवसेना युवा नेते उदय सांगळे, पंचायत समितीचे सदस्य जगन्नाथ भाबड, सरपंच रमेश आव्हाड, पोलीस पाटील ज्ञानेश्वर साबळे, नवनाथ आव्हाड, माजी सरपंच सोमनाथ आव्हाड, तलाठी जितेंद्र परदेशी, कृषी सहायक वनिता शिंदे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. गेल्या तीन दिवसांपासून दापूर परिसरातील दत्तनगर, माळवाडी, सोनेवाडी, गोंदे, खंबाळे, चापडगाव येथे वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाचा सर्वाधिक तडाखा दापूर गावाला बसला आहे. दोन किलोमीटरच्या परिसरात जोरदार वादळाने अनेकांच्या घरांचे पत्रे व छत उडून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दापूरच्या तेलमाथा येथील जगदंबा हायटेक नर्सरी वादळी वाऱ्याने जमीनदोस्त झाली. दापूर येथील विश्वनाथ आव्हाड यांच्या घरावर पिंपळाचे झाड पडल्याने पत्रे खाली आले. काशीनाथ आव्हाड यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने संसार उघड्यावर पडला.-----------------उपकेंद्राचे पत्रे उडालेदापूर आरोग्य उपकेंद्राचे पत्रे उडून गेल्याने औषधसाठा, कागदपत्रे भिजली. दत्ताराम आव्हाड यांच्या पडवीवर लिंबाचे झाड कोसळले. हिराबाई घुले यांच्या घराचे पत्रे उडून सचिन वेताळे यांच्या बंगल्यावर पडले. तसेच आदिवासी वस्तीत झाडे उन्मळून पडल्याने राम मोरे, पांडुरंग मोरे, दत्तू मोरे, गणेश जाधव, नंदू मोरे, पप्पू जाधव, छबू मोरे, नवनाथ माळी, विशाल माळी, साहेबराव माळी यांच्याही घरांची पडझड झाल्याने अनेक कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक