दापूरला घरांचे पत्रे उडाले : काही ठिकाणी विजेचे खांब कोसळले
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर येथे व परिसरात सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतातील तसेच आदिवासी वस्तीवर राहणाऱ्या घरांचे पत्रे उडाले असून, काही भागांत विजेचे खांब उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान, सोमवारी (दि. ३१) सकाळी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला.
शिवसेना युवा नेते उदय सांगळे, पंचायत समितीचे सदस्य जगन्नाथ भाबड, सरपंच रमेश आव्हाड, पोलीस पाटील ज्ञानेश्वर साबळे, नवनाथ आव्हाड, माजी सरपंच सोमनाथ आव्हाड, तलाठी जितेंद्र परदेशी, कृषी सहायक वनिता शिंदे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. गेल्या तीन दिवसांपासून दापूर परिसरातील दत्तनगर, माळवाडी, सोनेवाडी, गोंदे, खंबाळे, चापडगाव येथे वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाचा सर्वाधिक तडाखा दापूर गावाला बसला आहे. दोन किलोमीटरच्या परिसरात जोरदार वादळाने अनेकांच्या घरांचे पत्रे व छत उडून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दापूरच्या तेलमाथा येथील जगदंबा हायटेक नर्सरी वादळी वाऱ्याने जमीनदोस्त झाली. दापूर येथील विश्वनाथ आव्हाड यांच्या घरावर पिंपळाचे झाड पडल्याने पत्रे खाली आले. काशीनाथ आव्हाड यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने संसार उघड्यावर पडला.
-----------------
उपकेंद्राचे पत्रे उडाले
दापूर आरोग्य उपकेंद्राचे पत्रे उडून गेल्याने औषधसाठा, कागदपत्रे भिजली. दत्ताराम आव्हाड यांच्या पडवीवर लिंबाचे झाड कोसळले. हिराबाई घुले यांच्या घराचे पत्रे उडून सचिन वेताळे यांच्या बंगल्यावर पडले. तसेच आदिवासी वस्तीत झाडे उन्मळून पडल्याने राम मोरे, पांडुरंग मोरे, दत्तू मोरे, गणेश जाधव, नंदू मोरे, पप्पू जाधव, छबू मोरे, नवनाथ माळी, विशाल माळी, साहेबराव माळी यांच्याही घरांची पडझड झाल्याने अनेक कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.
----------------
सिन्नर तालुक्यातील दापूर येथे जोरदार वादळाने जमीनदोस्त झालेली नर्सरी. तर दुसऱ्या छायाचित्रात घराचे उडालेले पत्रे. (३१ नांदूरशिंगोटे २,३)
---------------------
सिन्नर तालुक्यातील दापूर येथे वादळाने नुकसान झालेल्या घरांची पाहणी करताना उदय सांगळे. समवेत सरपंच रमेश आव्हाड, ज्ञानेश्वर साबळे, नवनाथ आव्हाड आदी. (३१ नांदूरशिंगोटे १)
===Photopath===
310521\31nsk_7_31052021_13.jpg
===Caption===
३१ नांदूरशिंगोटे १/२/३