नाशिक : शहरात दुपारी दोन वाजेच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह पावसाचे आगमन झाले़ एकिकडे उन तर दुसरीकडे पाऊस असे चित्र बहुतांशी ठिकाणी होते़ या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली तर पंचवटीतील काही ठिकाणी रस्त्यावर पाऊसाचे पाणी साचले होते़ अचानक आलेल्या या पावसामुळे दुचाकीधारक तसेच शालेय विद्यार्थ्यांचीही चांगलीच धावपळ उडाली होती़
विजेचा कडकडाट व मेघ गर्जनेसह दुपारी दोन ते सव्वादोन वाजेच्या सुमारास शहरात पावसाला सुरूवात झाली़ शहरातील काही ठिकाणी उन तर काही ठिकाणी पाऊस असे वातावरण होते़ सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या या पावसामुळे दुचाकीधारक तसेच सायकलने प्रवास करणाºया नागरिकांची चांगलीच धावपळ झाली़ पावसात ओले होण्यापेक्षा निवाºयास थांबणेच बहुतांशी वाहनचालकांनी पसंत केले़
नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित मुंबई-आग्रा महामार्गावरील कालिका देवी यात्रोत्सवातील दुकानदार तसेच नवमीनिमित्त देवीच्या दर्शनासाठी गेलेल्याा नागरिकांची चांगलीच पळापळ झाली़ रस्त्यावर दुकान थाटलेल्या विक्रेत्यांना पटापट आपली दुकाने आवरावी लागली तर पंचवटीसारख्या काही भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते़ दरम्यान, नाशिकचे हवामान अंशत: ढगाळ व हलका पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता़