सिन्नर: भारनियमनाव्यतिरिक्त ओव्हरलोडमुळे वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, ट्रान्स्फाॅर्मर बदलून देण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना द्यावी लागणारी चिरीमिरी, ट्रान्स्फाॅर्मर बदलून देण्यास होणारा विलंब, अनामत भरूनही दहा -दहा वर्षे उलटूनही न मिळणाऱ्या वीज जोडण्या, मीटर रिडिंग न घेताच लादली जाणारी अव्वाच्या सव्वा वीज देयके, ऑनलाईन, ऑफलाईन तक्रारी करूनही त्यांचे निवारण न होणे यासारख्या असंख्य समस्या गावोगावच्या शेतकऱ्यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या महावितरण कंपनीच्या कामासंबंधात आयोजित जनता दरबारात मांडल्या. संबंधित अधिकाऱ्यांना जागेवरच जाब विचारून त्याचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह अधीक्षक अभियंता दारोली यांनी यावेळी दिल्या.
राज्य शासनाच्या नवीन कृषी वीज धोरणामुळे शेतकऱ्यांना तातडीने वीज कनेक्शन मिळणे सोपे होणार आहे. शेतकऱ्यांनी मागील देयकांची थकबाकी भरून वीजजोडण्या अधिकृत करून घ्याव्यात. थकीत बिलातून वसूल झालेली रक्कम गावात विजेचे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यासाठी वापरली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात गावे आणि तालुका विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल. त्यामुळे नागरिकांनी कृषी वीज धोरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार माणिकराव कोकाटे यांनी यावेळी केले.
महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रवीण दारोली, कार्यकारी अभियंता डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाघ, बाजार समितीचे सभापती लक्ष्मण शेळके, उपनगराध्यक्ष बाळू उगले, स्टाईसचे चेअरमन पंडित लोंढे, नगरसेवक वासंती देशमुख, मालती भोळे, पंचायत समिती सदस्य विजय गडाख, जयराम शिंदे, राजाराम मुरकुटे, डी. पी. आव्हाड, हरी वरंदळ आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. अधीक्षक अभियंता प्रवीण दारोली आणि कार्यकारी अभियंता डोंगरे यांनी महाविकास आघाडी सरकारने राबवलेल्या नवीन कृषी वीज धोरणासंदर्भात शेतकऱ्यांना माहिती देऊन ग्राहकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सुभाष कुंभार यांनी सूत्रसंचालन केले.
इन्फो
थकबाकी भरून लाभ
सिन्नर १ आणि २ अशा दोन्ही कार्यालयाच्या वतीने थकीत वीज देयके भरण्यासाठी तसेच नवीन वीज जोडणी कनेक्शन घेण्यासाठी जागेवर व्यवस्था करण्यात आली होती. तालुक्यातील विविध गावातील २४ शेतकऱ्यांनी १२ लाख ५० हजारांची थकबाकी भरून महावितरणच्या नवीन कृषी वीज धोरणाचा लाभ घेतला. या शेतकऱ्यांचा आमदार कोकाटे यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.
फोटो - ०२ जनता दरबार
सिन्नर येथे महावितरणच्या जनता दरबारात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आमदार माणिकराव कोकाटे. व्यासपीठावर महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रवीण दारोली, कार्यकारी अभियंता डोंगरे, सीमंतिनी कोकाटे, कोंडाजी आव्हाड, बाळासाहेब वाघ, लक्ष्मण शेळके, बाळू उगले, पंडित लोंढे आदी.
===Photopath===
020221\02nsk_25_02022021_13.jpg
===Caption===
फोटो - ०२ जनता दरबार सिन्नर येथे महावितरणच्या जनता दरबारात शेतकºयांना मार्गदर्शन करताना आमदार माणिकराव कोकाटे. व्यासपीठावर महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रवीण दारोली, कार्यकारी अभियंता डोंगरे, सिमंतीनी कोकाटे, कोंडाजी आव्हाड, बाळासाहेब वाघ, लक्ष्मण शेळके बाळू उगले, पंडित लोंढे आदि.