लासलगाव- निफाड तालुकयातील लासलगाव, निफाड, उगावसह विंचूर भागासह वेगवान वाºयसह झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे द्रक्षांसह इतर पिकांचे नुकसान झाले आहे.मंगळवारी पहाटेनंतर दुपारपर्यंत अवकाळी पावसाने निफाड तालुक्यातील लासलगाव , विंचुर, निफाड, नैताळे व उगाव परीसरातील गावांमध्ये वेगवान वाºयासह पावसाने झोडपून काढले. त्यामुळे द्राक्ष बागांवरील पिकांचे तसेच कांदा, गहु पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. लासलगाव परिसरातवनसगाव, सारोळे खुर्द शिवडी, ब्राह्मणगाव, वनस येथील काही शेतांमध्ये प्रचंड वाºयाने पाणी साचुन पावसामुळे काही द्राक्ष बागावरील द्राक्ष घड खाली पडले. तसेच द्राक्षबागांच्या पानांची पाणगळ झाली आहे.निफाड शहरासह तालुक्यातील काही गावांमध्ये मंगळवारी पहाटे सोसाट्याचा वारा होता. विजेच्या कडकडासह अवकाळी पाऊस झाला आहे. तसेच रोगट वातावरण बरोबरच सकाळी तालुक्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण तयार झाले होते. पावसाने होणाºया नुकसानीस कसे सामोरे जावे या विवंचनेत शेतकरी आहेत . द्राक्ष, कांदा , गहु , डाळिंब या पिकांचे मोठयÞा प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे या चारही पिकांचे उत्पादनात घट झाली आहे .
पावसाने द्राक्ष उत्पादक चिंतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 1:08 PM