येवला : येवला शहर व तालुक्यात परतीच्या पावसाने शुक्रवारी सायंकाळी अर्धातास जोरदार हजेरी लावली. पण हा पाऊस किमान १५ दिवसांपूर्वी आवश्यक होता, अशी अपेक्षा येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी मका व बाजरीचे दाणे भरण्याच्या परिस्थितीत पिकांना पाण्याचा ताण बसला आणि आता दाणे बारीक पडून गेले होते. आता पाऊस आला, पण उशिर झाला आहे. परतीच्या पावसानेदेखील जाताना हजेरी लावली व उशिर झाला. (वार्ताहर)
येवला तालुक्यात पावसाची हजेरी
By admin | Published: October 18, 2014 12:26 AM