वणी : सोमवारी दुपारच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे टमाट्यासह द्राक्षबागांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्गाच्या तडाख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांची अवस्था करु ण व दु:खदायी झाली आहे. सोमवारी वणी शहर व परिसरात पावसाने हाहाकार केला. अनेक रहिवाशांचे पुराचे पाणी घर व गुदामामध्ये शिरल्याने मोठी आर्थिक हानी झाली. प्रशासकीय व्यवस्थेने पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडले. शहरात पावसाचे आगमन होण्यापुर्वी रावळा जावळा डोंगर सप्तशृंगगडाच्या पर्वतरांगा मार्कंडेय पर्वत शितकडा ( सतीचा कडा) या ठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. उंच सखल भागात झालेल्या पावसाने रौद्र स्वरु प धारण केले होते. पावसाचे थेंब हे मोठ्या आकाराचे होते व पावसाचा वेग असामान्य होता. बंगले घरे व इतर निवासस्थानाच्या छतावर पाणी मावत नव्हते. काही जाणकारांच्या मते गेल्या चाळीस वर्षात असा पाऊस झाला नाही तर काही जुण्या जाणत्यांनी हा पाऊस म्हणजे ढगफुटीचा प्रकार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. वणी, मावडी, मुळाणे, बाबापुर, संगमनेर, भातोडे ,चंडिकापुर तसेच वणी कळवण रस्त्यावरील शेतकरी बांधवांना याचा फटका बसला.दिंडोरी तालुक्यात प्रामुख्याने टमाटा व द्राक्ष अशी नगदी पिके घेण्यात येतात प्रारंभीच्या काळातच पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते. कसाबसा पाऊस सुरु झाला पावसाने जोर पकडला. तालूक्यातील धरणे पुर्ण क्षमतेने भरली. विहीरी पुर्णत: भरल्या. नद्या नाले दुथडी भरु न वाहु लागले. थोडक्यात शेती व्यवसायाला अनुकुल स्थिती निर्माण झाली. या सर्व बाबी लक्षात घेऊन शेती व्यवसायाचे काम नियोजनबद्ध सुरु असताना सोमवारच्या पावसाने दाणाफाण केली.
पावसाचा टमाट्याबरोबरच द्राक्षबागांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 2:04 PM