मेशी - गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिक कडक उन्हाचा चटका सोसत असताना अचानक ढग जमून आले आणि पावसाने हजेरी लावून संकटात सापडलेल्या शेतक-यांना काहीसा दिलासा दिला . परंतु या पावसाने खरीप पिकांना मात्र फारसा उपयोग नाही. अजून पाऊस झाल्यास किमान रब्बी हंगाम तरी येईल अशी आशा वाटू लागली आहे. त्यामुळे काहीशा आशा पल्लवीत झाल्या आहेत. वातावरणात दमटपणा आणि अधूनमधून कडक उन असे विचित्र वातावरण आहे. त्यामुळे पावसाची आशा सर्वजण धरूनच आहेत. हवामान खात्याने पावसाचा अंदाज दिला आहे , त्यामुळे शेतक-यांना आशा आहे. पावसाळ्याचे उरलेल्या दिवसात पाऊस पडला तर रब्बी हंगामात शेतकरी खरिपाची भरपाई भरून काढण्यासाठी सज्ज होतील. मात्र खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. त्यामुळे उत्पादन कमालीचे घटणार आहे. त्यामुळे धान्य , चारा ,पैसे यांची झळ सोसावी लागणार आहे. त्यांचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. आजही कोणत्याच शेतमालाला बाजारभाव नाही. त्यामुळे शेतक-यांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे पुढील अपेक्षेवरच भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी अजून पावसाची आशा बाळगून आहेत.
मेशी परिसरात पाऊस, शेतकऱ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 1:32 PM