सटाणा : जिल्ह्यात येवला, सिन्नर, चांदवडसह सटाणा तालुक्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली.वादळी वाºयासह पाऊस झाल्याने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. अचानक आलेल्या पावसाने शेतात काढून ठेवलेला कांदा, चारा भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आज सकाळपासूनच उकाडा निर्माण झाला होता. दुपारी ३ वाजेच्या सुमारास वादळ सुटले. सटाणा शहरासह चौगाव, कºहे दोधेश्वर, कोळीपाडा अमरावतीपाडा, रातीर, अजमीर सौंदाणे, कुपखेडा, खिरमानी, नामपूर, आदी भागात तब्बल अर्धा तास धुव्वाधार पाऊस झाला. वादळी वाºयासह पाऊस झाल्याने ताडपत्री उडून गेल्याने शेतात काढून ठेवलेला व चाळीतील कांदा भिजून नुकसान झाले. वादळामुळे डाळींब पिक तसेच आंब्याचे नुकसान झाले.दरम्यान सायंकाळी पाच वाजता पुन्हा पावसाची रिपरिप सुरु होती.
जिल्ह्यात वादळी वाºयासह पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 12:32 AM
सटाणा : जिल्ह्यात येवला, सिन्नर, चांदवडसह सटाणा तालुक्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वाºयासह पाऊस झाल्याने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. अचानक आलेल्या पावसाने शेतात काढून ठेवलेला कांदा, चारा भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आज सकाळपासूनच उकाडा निर्माण झाला होता. दुपारी ३ वाजेच्या सुमारास वादळ सुटले. सटाणा शहरासह चौगाव, कºहे दोधेश्वर, कोळीपाडा अमरावतीपाडा, रातीर, अजमीर सौंदाणे, कुपखेडा, खिरमानी, नामपूर, आदी भागात तब्बल अर्धा तास धुव्वाधार पाऊस झाला.
ठळक मुद्देजनजीवन विस्कळित : सटाण्यात कांदा भिजलासायंकाळी पाच वाजता पुन्हा पावसाची रिपरिप सुरु होती.