शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

पावसाची विश्रांती; विसर्गात कपात

By admin | Published: August 05, 2016 1:05 AM

पावसाची विश्रांती; विसर्गात कपात

 नाशिक : सलग तीन दिवस झोडपून काढणाऱ्या पावसाने गुरुवारी तुरळक हजेरी लावून विश्रांती घेतल्यामुळे आकाश निरभ्र होऊन नाशिककरांना सूर्यदर्शनाने मोठा दिलासा मिळाला, तर दुसरीकडे धरणाच्या पाण्याच्या विसर्गातही कपात करण्यात आल्यामुळे गोदावरीचा पूर ओसरण्यास मदत झाली. गुरुवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत नाशिक शहरात ५३ मिलिमीटर इतकाच पाऊस नोंदविला गेला, तर दिवसभर पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेत, सूर्यदर्शन दिल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या चार दिवसांपासून सूर्यदर्शन न झाल्याने सर्वत्र कोंदट वातावरण निर्माण झाले होते. पाऊस थांबल्यामुळे पुरामुळे नुकसान झालेल्या तसेच घरे, दुकानांमध्ये पाणी शिरलेल्या नागरिकांना आवरासावर करण्यास मोठी मदत झाली. पूरपरिस्थितीमुळे दोन दिवस सुट्या मिळालेल्या शाळा, महाविद्यालये गुरुवारी पूर्ववत सुरू झाले. नाशिक शहरासह जिल्ह्णातही पावसाने चांगलीच उघडीप दिली. चोवीस तासांत ४७५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. नदी, नाल्यांना आलेला पूरही ओसरला. पावसाने विश्रांती घेताच गंगापूर धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग कमी करण्यात आला. सकाळी आठ वाजेपर्यंत ७९६९ क्यूसेकने सोडले जाणारे पाणी दुपारी चार वाजेनंतर ४९०५ क्यूसेक इतकी कमी करण्यात आले, त्यामुळे गोदावरीचा पूरही ओसरण्यास मदत झाली. (प्रतिनिधी)