नायगाव : गेल्या पंधरा दिवसांपासुन सुरू असलेल्या संततधार पावसाने नायगाव खोऱ्यातील शेकडो एकर शेतातील पिकांचे करोडो रूपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी ( दि.६) सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याने विस्कळीत झालेले नायगाव खाºयाचे जनजीवन हळुहळू पुर्वपदावर येऊ लागले आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करत आहे.नायगाव खाºयात सलग पंधरा दिवस पडलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील नायगाव, जायगाव, देशवंडी, वडझीरे, ब्राम्हणवाडे, सोनगिरी व जोगलटेंभी आदी गावातील कोबी, फ्लावर, टमाटे, मिरची, मका, बाजरी, सोयाबीन आदींसह भाजीपाल्यांचे शेतात साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे पिके सडून घाण झाली आहे. अनेक शेतकºयांच्या शेताचेही मोठे नुकसान झाले आहे.गेल्या पंधरा दिवसापासून पडणाºया कमी-अधिक पावसामुळे खोºयातील जनजीवन विस्कळीत झाले होते. शेतकºयांसह शेतमजुर, शालेय विद्यार्थी, चाकरमाने आदीं बरोबर जनावरांचे चांगलेच हाल झाले होते. मंगळवारी दुपारनंतर पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्याने शेतकºयांनी रेंगाळलेली शेती कामे हाती घेतल्याचे चित्र बघायला मिळाले.दरम्यान गेल्या पंधरा दिवसानंतर मंगळवारी सकाळी नायगाव खोºयातील ग्रामस्थांना सुर्यदर्शन झाले. दिवसभर पावसाची रिप-रिप व गारहवेमुळे शेताबरोबर घराचे पत्रेही कमकुवत झाले आहे. दिवसभर निर्माण होणाºया ढगाळ वातावरणामुळे व उन्हा अभावी नागरिकांचे मोठे हाल झाले होते. आज झालेल्या सुर्यदर्शनाने व अनेक दिवसांनी परिसरातील नद्या प्रभावित झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.महागडी बी-बियाणे, किटकनाशके, खते व मेहनत करून पिकविलेले विविध पीक आधी पाणी टंचाईमुळे व आता अतिपावसामुळे शेतातच सडल्याने बळीराजावर मोठे आर्थिक संकट कोसाळले आहे. नायगाव खोºयात पडलेल्या या पावसामुळे शेकडो एकर क्षेत्रातील पिकांचे नुकसान होऊन कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.गोदावरी व दारणेला आलेल्या महापुरात नदीकाठचे शेकडो कृषीपंप वाहून गेल्याने शेतकºयांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी ओसरताच शेतकºयांनी नदीच्या काठावर पंप शोधण्यासाठी गर्दी होत आहे.