नाशिक : गेल्या तीन ते चार दिवसांपासून जोरदार हजेरी लावणाºया पावसाने गुरुवारी जिल्ह्यात विश्रांती घेतल्याने नवरात्रोत्सव साजरा करणाºया देवीभक्तांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, पाऊस थांबल्याने जिल्ह्यातील धरणांमधून केल्या जाणाºया विसर्गात मोठी कपात करण्यात आल्याने गोदावरीसह अन्य नद्यांचा पूर हळूहळू ओसरू लागला आहे.जिल्ह्यात परतीच्या पावसाने गेल्या तीन ते चार दिवसांपासून हजेरी लावल्यामुळे त्याचा जनजीवनावर परिणाम झाला होता. विशेष करून नवरात्रोत्सवाच्या तयारीवर त्याचा परिणाम जाणवू लागल्याने मंडळांचे कामे रेंगाळली होती. या पावसामुळे खरिपाच्या पिकांना काहीसा दिलासा मिळून धरणांच्या पाणी साठ्यातही वाढ होण्यास मदत झाली. त्यामुळे आठ धरणांतून पाणी सोडण्यात आल्याने प्रमुख गोदावरीसह दारणा, कादवा या नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली. तथापि, गुरुवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात फक्त १२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
पाऊस ओसरला; विसर्गात कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:02 AM