शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

सिन्नर तालुक्यात पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 9:39 PM

सिन्नर : तालुक्यातील पश्चिम पट्यात तसेच शहर आणि ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. शहराच्या पश्चिमेस असलेल्या सरदवाडी धरण शनिवारी दुपारी ओव्हरफ्लो झाले.

ठळक मुद्देसरदवाडी धरण ओव्हरफ्लो; म्हाळुंगी, देवनदी, शिवनदी व सरस्वती नदीला महापूर

सिन्नर : तालुक्यातील पश्चिम पट्यात तसेच शहर आणि ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. शहराच्या पश्चिमेस असलेल्या सरदवाडी धरण शनिवारी दुपारी ओव्हरफ्लो झाले.शनिवारी सुरू असलेल्या पावसाने शहरातील सरस्वती, शिवनदी तसेच देवनदीच्या पाण्यात वाढ झाल्याने पूर आला होता. तालुक्याच्या अनेक भागात पावसाचा जोर असल्याने गावांचा संपर्क तुटला होता.तालुक्याच्या पूर्व भागातही पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी व नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यातील सर्वात मोठे भोजापूर, उंबरदरी, बोरखिंड, कोनांबे व सरदवाडी हे सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरले असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.जुलै महिन्याच्या शेवटच्या आठड्यात व आॅगस्टच्या सुरूवातीला पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने तालुक्यातील धरण साठ्यात वाढ झाली आहे.पश्चिम पट्यात चांगला पाऊस झाल्याने पूर्व भागासाठी वरदान ठरणारी देवनदी प्रवाहित झाली असून त्यावरील छोटे-मोठे बंधारे भरल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. खरीप व रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहे. कोनांबे धरण भरल्यानंतर अवर्षणग्रस्त पूर्व भागात वाहणारी देवनदी दोन दिवस झालेल्या पावसामुळे चांगलीच प्रवाहित झाल्याचे चित्र आहे.शनिवारी मध्यरात्री देवनदीचे पाणी वडांगळीच्या बंधायांपर्यंत पोहचले होते. देवनदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने दातली, खोपडी, मुसळगाव, कुंदेवाडी येथील पुलाच्या फरशीला पाणी लागल्याने संपर्क तुटला होता. पूर्व भागासाठी देवनदी वरदान ठरते. या नदीला पाणी आल्यानंतर बंधारे भरु न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागतो.तसेच शहरातून वाहणारी शिवनदी व सरस्वती नदी दुथडी भरून वाहत असल्याने पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. सरस्वती नदीला पूर आल्याने नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने गावात पाणी शिरले होते. तालुक्याच्या ग्रामीण भागात सुध्दा दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने बळीराजा सुखावला आहे.चौकट- सरदवाडी धरण भरलेसरदवाडी धरण शनिवारी पहाटे ओव्हरफ्लो झाले. धरणाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने शिवनदी प्रवाहीत झाली आहे. त्यामुळे देवनदीच्या पूर पाण्यात आणखी भर पडली असल्याने महापूर आला आहे.धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आठ दिवसांपासून संततधार पाऊस पडत होता. शिवनदीच्या उगमावर धरण असल्याने सांडव्याच्या पाण्यामुळे शिवनदी प्रवाही झाली आहे. हे पाणी शहराजवळ देवनदीस मिळते. सरदवाडी धरण भरल्याने पाणी योजनांना संजीवनी मिळण्यासह शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी उतरण्यास मदत होणार आहे.चौकट- मळा, गावाचा सिन्नरशी संपर्क तुटलातालुक्यातील वडझीरे परिसरात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने नागरेवस्ती, बोडके मळा व गावाचा सिन्नरशी संपर्क तुटला आहे. वडझीरे-सिन्नर रस्त्यावर पुराचे पाणी साचले होते. तसेच तालुक्याच्या पूर्व भागात शनिवारी रात्री पावसाने हजेरी लावल्याने नदी, नाले वाहत होते. वडांगळीचाही खंडागळीशी दुपारी संपर्क तुटला होता. देवनदीच्या पाण्यात वाढ झाल्याने मुसळगावच्या पुलावरून पाणी वाहत होते. नाशिक-पुणे महामार्गावरही सकाळी आप्पा धाब्याजवळ रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.