शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 8:58 PM

दिंडोरी : तालुक्यातील ननाशीसह परिसरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाºयासह झालेल्या पावसामुळे साद्राळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ननाशी परिसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास पावसाने वादळी वारे व मेघगर्जनेसह सुमारे एक तास जोरदार हजेरी लावली.

दिंडोरी : तालुक्यातील ननाशीसह परिसरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाºयासह झालेल्या पावसामुळे साद्राळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.ननाशी परिसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास पावसाने वादळी वारे व मेघगर्जनेसह सुमारे एक तास जोरदार हजेरी लावली. वादळी वाºयामुळे साद्राळे येथील जि. प. शाळेच्या छताचे सर्व पत्रे उडून गेले. तसेच किचन शेड, स्वच्छतागृहाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोबतच शाळेतील संगणक संच आणि टीव्ही संचामध्ये पावसाचे पाणी गेल्याने त्यांचेही नुकसान झाले. शाळेतील स्टेशनरी पूर्ण भिजून गेली आहे. सुदैवाने शाळेला सुटी असल्याने जीवितहानी टळली. या नुकसानीची तलाठी गायकर, ग्रामसेवक मोरे आदींनी पाहणी करून पंचनामा केला आहे. त्यात अंदाजे दोन लाख ८५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.----------------------सुरगाणा तालुक्यात झाड कोसळलेअलंगुण : सुरगाणा तालुक्यातील बाºहे परिसरात सोमवारी सायंकाळी वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाला. वाºयाचा जोर अधिक असल्याने ठाणगाव येथे बंसू गंगाराम पालवी यांच्या घरावर शेजारी उभे असलेले बदामाचे झाड कोसळले. यात घराचे नुकसान झाले. सुदैवाने परिसरात कोणी नव्हते. विजेच्या खांबावरील वीजवाहिन्या तुटून पडल्या. यावेळी वीजपुरवठा खंडित असल्यामुळे अनर्थ टळला. येथील माध्यमिक शाळेजवळील सौरविजेचा खांबही वादळाने आडवा झाला.--------------------------मालेगाव परिसरात वातावरणात बदल; गारव्यामुळे नागरिक सुखावलेमालेगाव : शहर, परिसरात सकाळी आठ वाजेच्या सुमारास झालेल्या तुरळक पावसामुळे वातावरणात बदल झाला असून, गारठा वाढल्याने उकाड्यापासून हैराण नागरिक सुखावले आहेत. वातावरणात बदल झाल्याने सर्दी-खोकला आदी साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे. आधीच नागरिकांनी कोरोनाची दहशत घेतली आहे. निरभ्र आकाश असताना अचानक आलेल्या सरींमुळे कामानिमित्त बाहेर जाणे नागरिकांनी टाळले. ग्रामीण भागात मात्र शेतकऱ्यांची बी-बियाणे खते यांची खरेदी आणि शेत मशागतीची अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरु असल्याचे दिसून आले.मालेगावी नदीपात्र स्वच्छता रखडली आहे. दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिकेतर्फेमोसम नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात येते;परंतु यंदा शहरात एप्रिल महिन्यापासून कोरोनाचे बाधित रुग्ण आढळून येऊ लागल्याने महापालिकेने सर्व लक्ष कोरोनाला रोखण्याकडे दिले आहे. यात नदी स्वच्छता मोहीम राबविण्याकडे दुर्लक्ष झाले. शहरातील नद्या आणि नाले स्वच्छता मोहीम राबविण्यात गती मिळालेली नाही. यंदा पावसामुळे धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतींवर लक्ष ठेवण्याची गरज आहे.--------------------------वीज बिघाडावर उपाययोजनेची मागणीननाशी येथे वादळामुळे मुख्य वीजवाहिनीचा एक खांब कोसळ्याने रात्रभर परिसरात अंधार होता. अनेक वृक्ष उन्मळून पडली. ननाशी येथील वीज उपकेंद्राला नाशिकवरून ३३ केव्ही मुख्य वीजवाहिनीवरून वीजपुरवठा केला जातो. या वाहिनीवरील खांब, वीजवाहिन्या जुन्या झाल्याने जीर्ण झाल्या आहेत. थोडासा जरी पाऊस किंवा वादळ झाले की खांब व वाहिन्या तुटून पडतात. यामुळे परिसरातील नागरिकांना नेहमी तीन तीन दिवस अंधारात राहावे लागते. वीज कंपनीने या मुख्य वीजवाहिनीच्या नेहमी होणाºया बिघाडावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात या वाहिनीवर बिघाड होणे ही नित्याची बाब झाली आहे.-------------------------------तीनशे क्विंटल कांद्यासह शेतोपयोगी साहित्याचे नुकसानजायखेडा : जयपूर, मेंढीपाडे शिवारातील रतनसिंह प्रतापसिंह सूर्यवंशी या शेतकºयाच्या शेतात वीज कोसळून कांद्याची चाळ व राहत्या घराचे झाप जळून खाक झाले. यात तीनशे क्विंटल कांद्यासह संसारोपयोगी व शेतोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. सोमवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास जायखेडा व परिसरात वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. दरम्यान जयपूर, मेंढीपाडे येथील सूर्यवंशी यांच्या शेतातील राहत्या घरावर वीज पडली. त्यामुळे लागलेल्या आगीत झापासह लगतची कांदाचाळ घरातील संसारोपयोगी व शेतोपयोगी साहित्य जळून खाक झाले. शेतकºयाचे हजारो रु पयांचे नुकसान झाले.

 

टॅग्स :Nashikनाशिक