नाशिक : शहर व परिसरात गेल्या रविवारी जोरदार पाऊस झाला होता, मात्र रविवारी (दि.१४) पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे शहरात शून्य मि.मी. पाऊस नोंदविला गेला. सकाळपासून हलक्या सरींचा रिमझिम अपवाद वगळता जोरदार पाऊस झाला नाही. गंगापूर धरण क्षेत्रातदेखील पावसाने विश्रांती घेतली. पाणलोट क्षेत्रात अंबोली वगळता अन्य ठिकाणी पावसाने हजेरी लावली नाही.रविवारी पहाटेच्या सुमारास काही वेळ हलक्या-मध्यम स्वरूपाच्या सरींचा वर्षाव झाला, मात्र तो फारसा टिकू शकला नाही. शहरात सध्या वाऱ्याचा वेग वाढला असून, ढग जरी दाटून येत असले तरी पावसाच्या सरी जोरदार बरसत नसल्याचा अनुभव नाशिककरांना येत आहे. मागील चार दिवसांपासून पावसाने समाधानकारक हजेरी लावली नसून रविवारीदेखील शून्य मि.मी. पाऊस पडला. दुपारी तसेच सायंकाळी सूर्यप्रकाशही नागरिकांनी अनुभवला. काही वेळ लख्ख ऊन पडले होते, सायंकाळपर्यंत वाºयाचा वेग टिकून होता.गंगापूर धरण५२.६६ टक्के भरलेगंगापूर धरण परिसरात पहाटे सहा वाजेपासून सायंकाळपर्यंत पावसाने हजेरी लावली नाही. पाणलोट क्षेत्रापैकी अंबोलीमध्ये २६ मि.मी.पर्यंत पाऊस पडल्याची नोंद झाली.४कश्यपी, गौतमी तसेच त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाने उघडीप दिली. गंगापूर धरणाचा जलसाठा २ हजार ९६५ दलघफू इतका झाला असून, धरण ५२.६६ टक्के भरले आहे.४इगतपुरीत पावसाचा जोर मात्र कायम राहिला. दिवसभरात ५१ मि.मी. इतकी पावसाची नोंद झाली आहे.
रविवारी पावसानेही घेतली विश्रांती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 1:52 AM
शहर व परिसरात गेल्या रविवारी जोरदार पाऊस झाला होता, मात्र रविवारी (दि.१४) पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे शहरात शून्य मि.मी. पाऊस नोंदविला गेला. सकाळपासून हलक्या सरींचा रिमझिम अपवाद वगळता जोरदार पाऊस झाला नाही. गंगापूर धरण क्षेत्रातदेखील पावसाने विश्रांती घेतली. पाणलोट क्षेत्रात अंबोली वगळता अन्य ठिकाणी पावसाने हजेरी लावली नाही.
ठळक मुद्देधरणक्षेत्रही कोरडे : शहरात शून्य मि.मी. पावसाची नोंद