----
शहर स्वच्छतेचा बोजवारा
मालेगाव : बकरी ईद सणानंतर महापालिकेने स्वच्छता मोहीम राबविणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून मोकळ्या भूखंडांवर व चौकाचौकांत कचऱ्याचे ढीग साचले आहेत. वॉटरग्रेस कंपनीच्या घंटागाड्या वेळेवर येत नाहीत. महापालिकेच्या स्वच्छता विभागाने शहरात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी केली जात आहे.
---
गटारींवरील ढापे बसविण्याची मागणी
मालेगाव : येथील महिला व बाल कल्याण रुग्णालयासमोरील सटाणा नाका, स्टेट बॅंक चौक रस्त्यावरील गटारींचे ढापे उघडले आहेत. उघड्या गटारींमुळे अपघाताची शक्यता आहे. महापालिकेने गटारींची साफसफाई करून तातडीने ढापे बसवावेत. पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्ताकडेच्या गटारींची स्वच्छता करावी, अशी मागणी केली जात आहे.
----
भाजीपाल्याच्या दरात वाढ
मालेगाव : कसमादे परिसरात दमदार पाऊस नसला तरी राज्यातील इतर भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. परिणामी भाजीपाल्यांची आवक घटली आहे. ताजा भाजीपाला उपलब्ध होत नाही, तसेच पावसामुळे भाजीपाला सडण्याचे प्रकार वाढले आहेत. भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे गृहिणींचे किचनचे बजेट कोलमडून पडले आहे.
----
दुचाकी चाेरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
मालेगाव : शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून दिवसाढवळ्या दुचाकी चोरी केली जात आहे. दरराेज वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद होत आहे. पोलीस प्रशासनाने दुचाकी चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करून या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.