नांदगाव:आपल्या समस्यांवर मार्ग काढून आपणच आपला उध्दार करावा....या उक्तीनुसार पाणी टंचाईचे उग्र स्वरूप कमी करण्याच्या उद्देशाने दोन महिने आधी सुरु केलेली श्रमदानाची चळवळ... त्यातून साकारलेले अकरा दगडी बांध एकूण चाळीस चर (सीसीटी ). पहिल्या पावसाचे थेंब त्यात साठून तब्बल तीन लाख लिटर पाणी अडले. शहराच्या कौतुकाचा विषय झालेल्या सुमित सोनवणे यांच्या सांघिक प्रयत्नांना नागरिकांनी भरभरून दाद दिली. बुधवारी सायंकाळी आलेल्या पावसाने तालुक्याला भिजवले.नांदगाव शहरालगत असलेल्या वन क्षेत्राच्या हद्दीत सुमित सोनवणे व त्यांच्या धडपडणाº्या टीमने मे महिन्याच्या रणरणत्या उन्हातचर खोदण्याचे काम केले. त्यांच्या या मेहनतीला निसर्गाने साथ दिली. मुसळधार नसला तरी पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब आपल्या ‘चरा चरात’ साठू लागल्याचा आंनद युवा मंडळींना झालाय.पाचवीला पुजलेला दुष्काळ आणि पाण्यासाठी त्राही माम होण्याची वेळ नेहमीच नांदगावकरांवर येते. राज्यात तिसº्या टप्प्यात सुरु होणाº्या पाणी फाउंडेशनच्या कामात नांदगावचा सहभाग असेल हा आशावाद देखील खोटा ठरला. आता आपणच काही तरी केले पाहिजे. यासाठी नांदगाव युवा फाउंडेशनचे सुमित सोनवणे व त्यांच्या टीमने कंबर कसली. अतुल निकम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले सकाळी मार्निंग वॉक च्या निमित्ताने जमणारे हे तरु ण स्वत:हून जतपुरा परिसरातील वनक्षेत्रात जमा झाले व त्यातून मानवी साखळी निर्माण झाली. त्यातून अकरा दगडी बांध एकूण चाळीस चर (सीसीटी ) खोदण्यात आले.--यापुढे ही असेच काम करत राहू. विषेश म्हणजे पाण्या बरोबर वाहून जाणारी सुपीक माती अडेल. आमच्या दररोज दिड तास आणि ३० दिवसांच्या श्रमदानाचे पाणी अडले. खूप आनंद झाला.- सुमित सोनवणे.27फोटो :नांदगावच्या तरु णाईच्या श्रमदानाला आलेले यश .... काही क्षणचित्रे पहिल्या पावसातली.(27नांदगाव सुमित सोनवणे)
निसर्गप्रेमींनी खोदलेल्या चरीत साचले पावसाचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 1:47 PM
नांदगाव:आपल्या समस्यांवर मार्ग काढून आपणच आपला उध्दार करावा....या उक्तीनुसार पाणी टंचाईचे उग्र स्वरूप कमी करण्याच्या उद्देशाने दोन महिने आधी सुरु केलेली श्रमदानाची चळवळ... त्यातून साकारलेले अकरा दगडी बांध एकूण चाळीस चर (सीसीटी ). पहिल्या पावसाचे थेंब त्यात साठून तब्बल तीन लाख लिटर पाणी अडले.
ठळक मुद्दे नांदगाव: पहिल्यााच पावसाने तालुक्याला भिजवले,