त्र्यंबकेश्वर : परतीच्या पावसाने जिल्ह्यात सर्वत्र थयथयाट केला असतांना दररोज भरुन येत असलेला पाउस आता जोरदार पडेलअसे वाटत असतांना पाउस मात्र पाठ फिरवून, जमुन आलेले काळे ढग विखुरले जातात. असा क्रम सध्या निसर्गाने मांडला आहे. बळीराजाला एका पावसाची गरज असतांना पाउस मात्र दररोज चकवा देत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वत्र पावसामुळे पिकांच्या नुकसानीच्या बातम्या वाचावयास मिळत असुन ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. तथापि त्र्यंबकेश्वर तालुक्यात मात्र किमान एका पावसाची अपेक्षा आहे. अर्थात पावसाचा थोडा फार शिडकावा होत असल्याने हातचे पिक जाण्याची शक्यता मात्र नाही. उत्पन्नात मात्र फरक पडणार आहे.गत शनिवारी (दि.१०) रोजी चित्रात नक्षत्राचे आगमन झाले असुन आता वळीव स्वरुपात पाउस पडुन सर्वत्र नुकसानी होत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात २१ऑगस्ट रोजी एक जण वाघ नदीला पूर आल्यामुळे वाहुन गेला त्यात तो मयत झाला.या व्यतिरिक्त तालुक्यात या वर्षी काहीही नुकसान झाली नाही. मागील वर्षी एकट्या त्र्यंबकेश्वर शहरात चार ते पाच वेळा अहिल्या गोदावरीला नदीला पूर आला होता. ओल्या दुष्काळाची मागणी करुन शेवटी शेवटी नुकसान भरपाई मिळाली. पण यावर्षी त्र्यंबक करांना एकही पुर पाहण्यास अगर अनुभवण्यास मिळाली नाही. सध्याचे चित्र मात्र सकाळ पासुन जमुना आलेला पाउस रात्री केव्हातरी विस्कटून जातो.
जिल्ह्यात पावसाचे थयथयाट त्र्यंबककडे मात्र केली पाठ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 10:35 PM
त्र्यंबकेश्वर : परतीच्या पावसाने जिल्ह्यात सर्वत्र थयथयाट केला असतांना दररोज भरुन येत असलेला पाउस आता जोरदार पडेलअसे वाटत असतांना पाउस मात्र पाठ फिरवून, जमुन आलेले काळे ढग विखुरले जातात. असा क्रम सध्या निसर्गाने मांडला आहे. बळीराजाला एका पावसाची गरज असतांना पाउस मात्र दररोज चकवा देत आहे.
ठळक मुद्देओल्या दुष्काळाची मागणी करुन शेवटी शेवटी नुकसान भरपाई मिळाली.