तत्काळ कार्यवाहीचे आदेश : ऊर्जामंत्री, वीजग्राहक शेतकºयांच्या प्रश्नांनी अधिकाºयांची उडाली भंबेरी
नाशिक : वीज ग्राहकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आलेल्या ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर महावितरणच्या कारभाराविषयी तक्रारींचा पाऊस पडला. या जनता दरबाराच्या माध्यमातून जिल्हाभरातील विविध भागातील शेतकºयांसह घरगुती वीज ग्राहक, औद्योगिक वीज ग्राहकांसह लोकप्रतिनिधींनीही महावितरण विरोधात आपली गाºहाणी मांडली. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ऊर्जामंत्र्यांनी अधिकाºयांना विचारणा केली असता अधिकाºयांची भंबेरी उडाली.जनता दराबारासाठी नाशिकमध्ये आलेल्या ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते बुधवारी (दि. १३) १० उपकेंद्रांचे लोकार्पण व सात उपकेंद्रांचे भूमिपजून करण्यात आले. उपनगर येथील इच्छामणी मंगल कार्यालयातील जनता दरबारात वीज ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेत महावितरणच्या कामकाजाची झाडाझडती घेतली. यावेळी शेतकºयांच्या विविध समस्यांचे निराकरण करताना वाड्या- वस्त्यांवर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी, तसेच शेतवस्तीवर सिंगल फेज विद्युत पुरवठा करण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश देतानाच त्यासाठी आर्थिक तरतुदीचे आश्वासनही त्यांनी यावेळी वीज ग्राहकांना दिले. शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी शेतकºयांची बाजू आक्रमकपणे मांडताना २०११-१२ पासून कोटेशन भरूनही २५ हजार शेतकºयांना अधिकृत जोडण्या मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर महावितरणची घरगुती, वाणिज्य, औद्योगिक, यंत्रमाग व कृषी क्षेत्राची मिळून सुमारे १२०० कोटी रुपयांचे वीजबिल थकीत असल्याने महावितरणची आर्थिक क्षमता नसल्याचे स्पष्ट करतानाच अशा शेतकºयांसाठी मुख्यमंत्री सौरवाहिनी विद्युत योजनेच्या माध्यमातून शेतकºयांना कृषिपंपांसाठी सौरप्रकल्प उभारून अल्पदरात वीज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.