सुरगाणा : यावर्षी पाऊस महिनाभर लांबल्याने गत वर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत पाऊस कमी झाल्यामुळे तालुक्यातील बहुतांश पाझर तलाव तुडूंब भरलेले नाहीत.पाऊस ऊशिरा सुरू झाल्याने शेती कामांना उशीर झाला आहे. तालुक्यात पाच ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र असून या सर्व ठिकाणी गेल्या वर्षी नऊ जुलै रोजी पर्यंत सर्वाधिक सुरगाणा येथे ३९१.८ मी. मी. पाऊस झाला होता. त्याखालोखाल उंबरठाण येथे ३३३.४ मी. मी., बोरगाव येथे २९६ मी. मी., बाºहे येथे २६२.६ मी. मी. तर मनखेड येथे २५८.५ मी. मी. एवढा पाऊस झाला होता.मात्र यावर्षी सुरगाणा येथे ५३.३ मी. मी., उंबरठाण येथे ३५.७, बाºहे येथे २२.४, मनखेड येथे २१.८ तर बोरगाव येथे १८.२ मी. मी. एवढाच पाऊस झाला असल्याने चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे. दरम्यान सुरगाणा येथील मोतीबाग पाझर तलाव भरला नसल्याने सांडव्यातून पाणी वाहून जाण्याचे प्रमाणही कमी आहे.यंदाच्या पावसामुळे मोतीबाग पाझर तलावात जमा झालेले पाणी.(फोटो १० सुरगाणा)
सुरगाणा तालुक्यात पाऊसाचे प्रमाण कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 6:49 PM
सुरगाणा : यावर्षी पाऊस महिनाभर लांबल्याने गत वर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत पाऊस कमी झाल्यामुळे तालुक्यातील बहुतांश पाझर तलाव तुडूंब भरलेले नाहीत.
ठळक मुद्देसुरगाणा येथील मोतीबाग पाझर तलाव भरला नाही