शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

जिल्ह्यात पावसाचा रौद्रावतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 10:35 PM

नाशिक : गेल्या दहा दिवस संततधार सुरू असतानाच शनिवारी रात्रभर आणि रविवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले यांना मोठे पूर येत अनेक नद्यांनी धोक्याची पातळी गाठल्याने अनेक पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्कतुटला आहे. सायखेडा-चांदोरीला पुराच्या पाण्याने वेढा दिला असून, इगतपुरी तालुक्यात अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. निफाड परिसरात द्राक्षबागांसह शेती पाण्याखाली आली असून सिन्नरच्या देवनदीला महापूर आला आहे.

ठळक मुद्देपेठ तालुक्यात विक्रमी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या दहा दिवस संततधार सुरू असतानाच शनिवारी रात्रभर आणि रविवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले यांना मोठे पूर येत अनेक नद्यांनी धोक्याची पातळी गाठल्याने अनेक पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्कतुटला आहे. सायखेडा-चांदोरीला पुराच्या पाण्याने वेढा दिला असून, इगतपुरी तालुक्यात अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. निफाड परिसरात द्राक्षबागांसह शेती पाण्याखाली आली असून सिन्नरच्या देवनदीला महापूर आला आहे.नाशिक-कळवण रस्त्यावरील कोळवण नदीवरील पुलावरून पाणी असल्याने सकाळी १० पासून वाहतूक ठप्प आहे. गुजरात, सप्तशृंगगड, सुरगाणा, कळवण जाणारी वाहने रस्त्यावर उभी आहे. वाघाड उजवा कालवा मडकीजामजवळ फुटला आहे; मात्र तो नदीशेजारी फुटल्याने कोणतीही हानी झालेली नाही. वाघाड धरण ओव्हरफ्लो झाले असून, करंजवण पुणेगाव धरण ८० टक्के भरल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.पालखेड धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून, कादवा नदीलाही मोठा पूर आला आहे. दिंडोरी शहरातून जाणाऱ्या धामण नदीला मोठा पूर आला असून, पालखेड रोडवरील पूल पाण्याखाली जात तालुक्याचा पूर्व भागाशी संपर्कतुटला आहे. दिंडोरी शहरातून पालखेड, पिंपळगाव, ओझरकडे जाणारा, उमराळे पेठकडे जाणारा, वणी ननाशीकडे जाणाºया विविध रस्त्यांचे पुलावर तसेच नाशिककडे जाणाºया रणतळ येथे रस्त्यावर पाणी आल्याने सर्वत्र वाहतूक ठप्प होत तालुक्याशी संपर्कतुटला. गोदाकाठ परिसरात सायखेडा, चांदोरीत हजारो नागरिक सुरक्षितस्थळीसायखेडा/चांदोरी : गंगापूर व दारणा धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग आणि दिवसभर जिल्ह्यात सुरू असलेली संततधार यामुळे सायखेडा, चांदोरी गावांना पुराने वेढा दिला असून, सायखेडा येथील चौफुली, मेनरोड, तेलीगल्ली, भवानी पेठ, पोलीस ठाणे, बाजार समिती, चाटोरी रोड आदी भागात दहा ते बारा फूट उंचीपर्यंत पाणी शिरले आहे. त्यामुळे परिसरातील हजारो नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांनी सुरक्षितस्थळी हलविले आहे.  पेठ तालुक्यात विक्रमी पाऊस  पेठ : शनिवार सकाळपासून पेठ तालुक्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असून, सर्वच रस्ते पाण्याखाली गेल्याने जवळपास १०० पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. पेठपासून जोगमोडीकडे जाणाºया संगमेश्वर नदीला मोठा पूर आला असून, त्यामुळे सुरगाण्याकडे जाणारे सर्व रस्ते बंद झाले आहेत. करंजाळी- हरसूल मार्गावरील फरशीवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक विस्कळीत आली आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, प्रचंड गतीने पाणी वाहत असल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून, मानवी वस्तीत पाणी घुसले आहे.तालुक्यातील जुनोठी परिसरात मुसळधार पावसामुळे शिवारातील पाझर तलावाच्या बांधावरून पाणी गेल्याने तलावाला भगदाड पडले आहे. पाण्याच्या प्रवाहाने मोठ्या प्रमाणावर माती वाहून गेल्याने शेतकºयांच्या शेतात पाणी घुसल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.गुजरातकडे जाणाºया राष्ट्रीय महामार्गावर चाचडगावजवळ पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजंूची वाहतूक थांबविण्यात आली आहे.सुरगाण्यात पुलावरून पाणीसुरगाणा : शहरासह तालुक्यात शनिवारी रात्रभर धुवाधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी रस्ते व फरशी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. नदीकाठावरील नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने तालुक्यातील माणी, बाºहे, मनखेड, जाहुले, हस्ते, ननाशी आदी ठिकाणी फरशीवरून पुराचे पाणी वाहत आहे. तसेच डोल्हारे गावातील फरशी पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे नागरिकांचा संपर्क तुटला असून, जनजीवन विस्कळित झाले आहे. नागरिकांनी दुचाकी किंवा चारचाकी वाहने पूरपाण्यातून नेऊ नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन तहसीलदार दादासाहेब गिते यांनी केले आहे. माणी गावाकडे जाणाºया रस्त्यावर पुराचे पाणी आहे. बाºहेगावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. अशीच परिस्थिती पिंपळसोंड परिसरात आहे. शहरासह तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून पाऊस सुरूच आहे.रविवारी सुरगाणा येथे सर्वाधिक १८० मिमी पाऊस झाला, तर मनखेड १३८ मिमी, बाºहे १३२ मिमी, बोरगाव १२५मीमी व उंबरठाण येथे ९१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे प्रवाशांचे हाल झाले.पांगरीत घराची भिंत कोसळलीसिन्नर : तालुक्यातील पांगरी बुद्रुक येथे संततधार पावसाने बंद असलेल्या घराची दगडी भिंत कोसळल्याची घटना रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. सदरचा रस्ता हा गावातील रहदारीचा असून, याच ठिकाणी हा प्रकार घडला. भिंत पडण्यापूर्वी काही मिनिटे दोन मुली याच रस्त्याने किराणा दुकानात गेल्या होत्या. अजूनही अर्धी भिंत पडण्याच्या अवस्थेत असल्याने धोकादायक आहे. प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन याबाबत कार्यवाही करण्याची मागणी होत आहे. ग्रामपंचायतीने अशा धोकादायक घरांची पाहणी करून उचित कार्यवाही करावी, यामुळे पुढील धोके टळतील, अशी मागणी रमेश दळवी यांनी केली आहे.