लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : तालुक्यातील बोधे येथे कालच्या मुसळधार पावसात शेतकरी बबन नामदेव साळे यांच्या शेताचे प्रचंड नुकसान झाले. त्यांच्या शेताजवळून शिवार नाला जातो. या नाल्यातून कालच्या पावसाचे प्रचंड पाणी त्यांच्या शेतात तुंबले. त्यांच्या शेतातील बाजरी व मका पीक वाहून गेले.परिसरातील जी पिके उपळली. त्यांच्या शेतातील काही भागाचा सुपीक स्तर वाहून गेला. संबंधित शेताची कृषी सहाय्यक श्रीमती निकम यांनी संबंधित शेताची शेतमालक व गावकऱ्यांसह पाहणी केली. यांचबरोबर परिसरातील बºयाच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढवलेले आहे. नुकसानीच्या पाहणीदरम्यान समाधान साळे, योगेश साळे, वाल्मीक सूर्यवंशी, आबा सूर्यवंशी, चैत्राम सूर्यवंशी, आनंदा जाधव, प्रा. हिरालाल नरवाडे, विजय मराठे, शांताराम वाघ, संतोष कचवे, विजय सूर्यवंशी, शांताराम सोनवणे, आनंदा वाघ, राजधर वाघ आदी ग्रामस्थ उपस्थित होते. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे़
बोधे येथे पावसाने पिके गेली वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 9:39 PM
मालेगाव : तालुक्यातील बोधे येथे कालच्या मुसळधार पावसात शेतकरी बबन नामदेव साळे यांच्या शेताचे प्रचंड नुकसान झाले. त्यांच्या शेताजवळून शिवार नाला जातो. या नाल्यातून कालच्या पावसाचे प्रचंड पाणी त्यांच्या शेतात तुंबले. त्यांच्या शेतातील बाजरी व मका पीक वाहून गेले.
ठळक मुद्देशेताची कृषी सहाय्यक श्रीमती निकम यांनी संबंधित शेताची शेतमालक व गावकऱ्यांसह पाहणी