लखमापूर : दिंडोरी तालुक्यात पावसाने पिकांचे मोठे नुकसान केल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला असून, या परिस्थितीतही खरीप पिकांना जीवदान देण्यासाठी त्यांची धावपळ दिसून येत आहे.सध्या दिंडोरी तालुक्यात वातावरणात कमालीचा बदल झाल्याने बळीराजांच्या भुवया उंचावल्या आहेत. खरीप हंगाम घेण्यासाठी शेतकरीवर्गाला मोठी धावपळ करावी लागत आहे. सततच्या बदलत्या वातावरणामुळे हंगाम घेण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.भांडवल जास्त व उत्पन्नाची आवक कमी हे समीकरण सध्या तालुक्यातील शेतकरी वर्गामध्ये पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे पिकांना हमीभाव न मिळाल्याने तालुक्यातील शेतकरी हतबल झाला आहे.---------------------------शेतकºयांनी मिळेल तेथून हात उसनवारी, कर्ज घेऊन पिके घेतली. मात्र पावसामुळे व वातावरणातील बदलामुळे पिके धोक्यात आली आहेत. दिंडोरीच्या पश्चिम पट्ट्यात पावसाने मोठ्या प्रमाणात कहर केल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. दिंडोरी तालुक्यातील शेतकºयांनी खरीप हंगामाचे उद्दिष्टे पूर्ण केले; पिके ऐन बहरात असताना बळीराजाला अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करावा लागला. त्यात वीजबिल अव्वाच्या सव्वा आल्याने शेतकºयांपुढील संकट वाढले आहे. (११ लखमापूर)
दिंडोरी तालुक्यातील पिकांना पावसाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 4:13 PM