नाशिक : सोमवारी बारा तासांत २६ मि.मी. इतका पाऊस झाल्याने समाधान व्यक्त होत होते; मात्र मंगळवारी मध्यरात्रीपासून पावसाने विश्रांती घेत दिवसभर दांडी मारली. अधूनमधून मान्सूनच्या काही सरींचा वर्षाव झाल्याने २ मि.मी. पावसाची नोंद झाली.मंगळवारी दिवसभर ढगाळ हवामान होते; मात्र पावसाची बारा तासांत दमदार हजेरी लावली नाही. शहरावर ढग दाटून आले; मात्र सरींचा वर्षाव झाला नाही. त्यामुळे मंगळवारचा दिवस कोरडा गेला सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. यामुळे मंगळवारीदेखील पावसाचा जोर कायम राहील, असे नागरिकांना वाटत होते; मात्र सकाळी काही वेळ सूर्यदर्शन घडल्याने नागरिक आश्चर्यचकित झाले. पावसाची उघडीप झाल्याने दिवसभर प्रतीक्षा कायम राहिली. रात्रीपर्यंत पावसाने वर्दी दिली नाही. सोमवारी सकाळी ६ वाजेपासून मंगळवार सकाळपर्यंत २४ तासांत गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ९५ मि.मी. इतका पाऊस झाला. यामुळे गंगापूर धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन जलसाठा एक हजार ६०६ दलघफूपर्यंत पोहचला असून, सध्या २८.५२ टक्के धरणात जलसाठा आहे. या हंगामात नाशिकमध्ये सुमारे १३७.६ मि.मी. इतका पाऊस अद्याप झाल्याची नोंद पेठरोडवरील हवामान खात्याच्या केंद्राने केली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने हंगामातील पाऊस १५६ मि.मी. इतका मोजला आहे.जलसाठा एक हजार ६०६ दलघफूपर्यंत पोहचला असून, सध्या २८.५२ टक्के धरणात जलसाठा शिल्लक
पावसाची दांडी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 1:35 AM
नाशिक : सोमवारी बारा तासांत २६ मि.मी. इतका पाऊस झाल्याने समाधान व्यक्त होत होते; मात्र मंगळवारी मध्यरात्रीपासून पावसाने विश्रांती घेत दिवसभर दांडी मारली. अधूनमधून मान्सूनच्या काही सरींचा वर्षाव झाल्याने २ मि.मी. पावसाची नोंद झाली.
ठळक मुद्देढगाळ हवामान : दिवसभरात २ मि.मी. पाऊस