खामखेडा : नाशिक जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवासापूर्वी बेमौसमी पावसाने तीन -चार दिवस धुमाकूळ घातल्याने शेती पिकांची धूळधाण झाली आहे. या पावसाने रब्बी पिकांची आशा उंचावेल आशी चर्चा होत असली तरी खरीपाचे नुकसान झाले ते भरून निघणारे नाही.खरीपाच्या प्रारंभापासून पावसाने शेतकऱ्यांची कसोटी पाहिली आहे. आता या कसोटीला उतरलेल्या शेतकºयांची खरी परीक्षा या निसर्गाच्या लहरीपणा पाहात आहे.गेल्या पंधरा दिवासापूर्वी अचानक वातावरणात बदल होऊन बेमोसमी पावसाने वादळी वाºयासह जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात झोडपुन काढले. त्यामुळे हताशी आलेल्या खरीपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.सुरवातीला मुळातच पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे नदी-नाले, धरणे कोरडे होते. त्यामुळे भुगर्भातील जलाशयाच्या पातळीत वाढ पाहिजे त्या प्रमाणात झाली नव्हती.दर वर्षी दिवाळी आधी खरीप पिकांची काढणी होत असे तसेच दिवाळी अगोदर पोळ कांद्याची काढणी होऊन कांदा दिवाळी पूर्वी विकला जात असे. परंतु चालु वर्षी पावसाअभावी लाल कांद्याची उशिरा लागवड झाल्याने दिवाळी नंतर लाल कांदा तयार होणार आहे. जो काही लवकर लागवड झाला आहे. तो अजूनही काढणीसाठी वेळ आहे.या अचानक आलेल्या या पावसामुळे शेतात कांद्याच्या वाफ्यात पाणी साचू लागल्याने शेतातील उभा काढणीस आलेला कांदा शेतातच सडण्याची शक्यता असते. तेव्हा कांद्यावर केलेला खर्च भरून निघतो की नाही यांची चिंता बळीराजा पडली आहे.खामखेडा परिसरातील शेतकरी मोठया प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड केली जाते. कांदा या पिकाकडे नगदी पीक म्हणून उन्हाळी कांद्याकडे पाहिले जाते. शेतकºयाकडे खरीपाचा कांदा फारसा नाही. त्यामुळे दिवाळी नंतर आहे त्या पाण्यावर उन्हाळी कांदा लागवडीची शेतकरी तयारी करीत असतो.मात्र गेल्या पंधरा दिवसापूर्वी झालेल्या बेमोसमी पाऊसाने लागवडीस आलेले व अत्यंत नाजुक असे रोपे आता पिवळी पडू लागल्याने खराब होऊ लागली आहे. आता पर्यत शेतकºयाने दोन वेळा उन्हाळी कांद्याचे बियाणे टाकली. परंतु या पाऊसाने ती ती तग धरु शकली नाहीत. त्यामुळे उन्हाळी कांद्याच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तसेच चालु वर्षी उशिरा पावसामुळे खरीपाच्या पेरणी उशिरा झाल्याने बाजरी, मका आदि पिकांची कापणी उशिरा झाल्याने शेतात उघड्यावर पडलेला मका व बाजरीचा कडबा या अवकाळी बेमोसमी पावसामुळे भीजुन गेल्याने तो काळा पडून शेतात सडून गेल्याने चाºयाची टंचाई आतापासून शेतकºयाला भासू लागली आहे. त्यामुळे या अवकाळी पावसाने शेतीमालाची धूळधाण केली आहे. त्यामुळे आता पुढील नियोजन कसे करावे या चिंतेत शेतकरी सापडला आहे.
पाऊसाचा धुमाकूळ अन् शेतकऱ्यांची कसोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 9:05 PM
खामखेडा : नाशिक जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवासापूर्वी बेमौसमी पावसाने तीन -चार दिवस धुमाकूळ घातल्याने शेती पिकांची धूळधाण झाली आहे. या पावसाने रब्बी पिकांची आशा उंचावेल आशी चर्चा होत असली तरी खरीपाचे नुकसान झाले ते भरून निघणारे नाही.
ठळक मुद्देरोपे आता पिवळी पडू लागल्याने खराब होऊ लागली आहे.