मानोरी : येवला तालुक्यातील पश्चिम भागातील मानोरी, मुखेड फाटा, परिसरात दमदार पाऊस तर नेऊरगाव, निमगाव मढ आदी परिसरात अती मूसळधार पावसाने शनिवारी (दि.२२) रात्री अकरा वाजेच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह मान्सूनच्या पहिल्याच पावसाने धडाकेबाज आगमन करत बळीराजाला मोठा दिलासा दिला.गेल्या सहा ते सात महिन्यापासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या येवला तालुक्यातील पश्चिम भागात कुणी पाणी देत का पाणी म्हणण्याची वेळ शेतकरी वर्गावर ओढवली होती. निमगाव मढ परिसरात हजारो क्विंटल कांदा पावसाने खराब झाला तर पिकांचे, भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले असून निमगाव मढ, ब्राम्हणगाव परिसरात पावसाने रस्ता देखील या अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे खचला आहे. दोन ते तीन तास चाललेल्या या पावसाने नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात सर्वाधिक ५४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.गत पंधरा दिवसापूर्वी येवला तालुक्यात मान्सून पूर्व अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. आण ियाच अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांच्या मशागतीला शेतकऱ्यांनी सुरु वात केली होती. त्यानंतर पंधरा दिवस उन्हाचा पारा वाढला होता दिवसरात्र केवळ जोराचा वारा सुटत होतापाऊस येतो की नाही याची मोठी भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे या पंधरा दिवसात शेतकरी वर्गाला गत वर्षीच्या आठवणी ताज्या होत यंदाही खरीप हंगामातील पिकांची लागवड उशिरा करावी लागणार की काय अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली होती.शनिवारी झालेला पाऊस जोराचा होता खरा, पण त्याचे पाणी वावरात न थांबता मोठ्या प्रमाणात वाहून गेले असल्याने जमिनीत समाधानकारक ओलावा निर्माण न झाल्याने खरीप हंगामातील पिकांची लागवड करावी की नाही अशी द्विधा मानोरी परिसरातील शेतकºयांना लागली आहे.रस्त्याच्याकडेला असलेल्या नाल्यामध्ये पावसाचे पाणी तुडुंब भरून वाहत होता तर गोई नदीतील मोठे खड्डे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरले होते. महिन्याभरापासून येवला तालुक्यात केवळ टोमॅटोच्या लागवडीसाठी शेतकरी वर्ग दिसून येत होता. मात्र या पावसामुळे येवला तालुक्यातील पश्चिम भागातील काही ठिकाणी पेरणी योग्य पाऊस झाला असून मका, सोयाबीन, खतांच्या खरेदीसाठी शेतकरी वर्गाने कृषी केंद्रात गर्दी केली असल्याचे दिसून येत आहे.मानोरी, देशमाने, मुखेड, खडकीमाळ आदी परिसरात अजून असाच एक मुसळधार पडल्यास हमखास खरीप हंगामातील पिकांच्या लागवडीस शेतकरी लागणार असल्याचे बोलले जात आहे. रविवारी (दि.२३) सकाळ पासूनच पुन्हा ढगाळ वातावरण होते. तसेच वाºयाचा वेग पूर्ण कमी झाल्याने दमट वातावरण होते आणि विशेष बाब म्हणजे रविवारी पूर्ण दिवस सुर्यनारायणाने दर्शन दिले नव्हते.
येवल्यात पाऊस मनसोक्त बरसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 18:42 IST
मानोरी : येवला तालुक्यातील पश्चिम भागातील मानोरी, मुखेड फाटा, परिसरात दमदार पाऊस तर नेऊरगाव, निमगाव मढ आदी परिसरात अती मूसळधार पावसाने शनिवारी (दि.२२) रात्री अकरा वाजेच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह मान्सूनच्या पहिल्याच पावसाने धडाकेबाज आगमन करत बळीराजाला मोठा दिलासा दिला.
येवल्यात पाऊस मनसोक्त बरसला
ठळक मुद्दे तीन तासांत तालक्यात ५४ मिलिमीटर पावसाची नोंदमानोरी परिसरात अजून एका दमदार पावसाची प्रतीक्षा