नाशिक : पावसाला सुरुवात झाली असली तरी नाशिककरांना अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. मागील चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून, हंगामातील पाऊस २२५ मि.मी.वर पोहोचला आहे. शनिवारी (दि.१४) बारा तासांत १४.४ मि.मी. पावसाची नोंद झाली.मागील बुधवारपासून शहरात पावसाचे पुन्हा ‘कमबॅक’ झाले आहे. बुधवारी दिवसभर संततधार सुरू होती. त्या तुलनेत गुरुवारी काहीसे प्रमाण कमी झाले; मात्र शुक्रवारी पुन्हा दिवसभर पावसाच्या सरींचा संतत वर्षाव सुरू होता. सकाळी साडेआठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पावसाचे प्रमाण कमी राहत असून संध्याकाळी पाच वाजेनंतर मात्र पावसाचा जोर शहरात वाढत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. शनिवारी संध्याकाळपर्यंत २.४ मि.मी. पाऊस झाला.मागील वर्षी जुलैच्या पंधरवड्यापर्यंत हंगामी ४९१ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. १३ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजेपासून दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत २४ तासांत ५३ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. २०१६ साली मात्र या तारखांला केवळ १.६ मि.मी. पाऊस झाला होता. यावर्षी त्या तुलनेत पर्जन्यमानाचे प्रमाण निम्म्यापेक्षा घसरले आहे.
पावसाची दिवसभर रिपरिप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:47 AM
नाशिक : पावसाला सुरुवात झाली असली तरी नाशिककरांना अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. मागील चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून, हंगामातील पाऊस २२५ मि.मी.वर पोहोचला आहे. शनिवारी (दि.१४) बारा तासांत १४.४ मि.मी. पावसाची नोंद झाली.
ठळक मुद्देबारा तासांत १४.४ मि.मी. पावसाची नोंद