नाशिक : महाराष्ट्रातील बहुसंख्य बांधकाम व्यावसायिकांनी रेरा कायद्यास सकारात्मक प्रतिसाद दिला असून, या कायद्यामुळे बांधकाम व्यवसायातील पारदर्शकता वाढली आहे. रेरा कायद्याचा मूळगाभाच पारदर्शकता असल्याने या कायद्यामुळे बांधकाम व्यावसायिकांचा सन्मान उंचावला असून, या व्यवसायाला खऱ्या अर्थाने उद्योगाचा दर्जा प्राप्त होत असल्याचे प्रतिपादन महारेराचे अध्यक्ष गौतम चॅटर्जी यांनी केले आहे.आरोग्य विज्ञान विद्यापीठातील धन्वंतरी सभागृहात क्रेडाई महाराष्ट्रातर्फे ‘वारे बदलाचे’ संकल्पनेवर आधारित ‘महाकॉन-२०१८’ या दोन दिवसीय परिषदेच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर क्रे डाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया, क्रे डाई नशनलचे प्रेसिडेंट (इलेक्ट) सतीश मगर, परिषदेचे समन्वयक गिरीश रायभागे, क्रे डाई नॅशनलच्या कार्यकारी समितीचे सभासद अनंत राजेगावकर, क्रे डाई नॅशनलच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष जितूभाई ठक्कर व क्रे डाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष सुनील कोतवाल उपस्थित होते. महारेराच्या सुरुवातीनंतरच्या पहिल्या वर्षातील घटनांचा आढावा घेताना गौतम चॅटर्जी म्हणाले, महारेरापूर्वी विविध कारणांनी बांधकाम व्यावसायिक व ग्राहक यांच्यात अनेकदा संशयाच्या वातावरणासोबत विविध कारणांनी दुरावा निर्माण होत होता. रेरामुळे हा दुरावा कमी झाला असून, प्रकल्पाबाबत आर्थिक शिस्त व जबाबदारीने बांधकाम व्यवसायाबाबत चांगले वातावरण निर्माण झाले आहे. प्रकल्पामध्ये बुकिंग करणारा ग्राहक हा आपल्या प्रकल्पाचा भागधारक असल्याचे बांधकाम व्यावसायिकांनी समजणे गरजेचे असून, रेरामुळे ग्राहकालाही असा विश्वास निर्माण होत असल्याने बांधकाम व्यावसायिक व ग्राहक यांच्यात निरंतर संवादाची प्रक्रिया विकसित होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, सर्व सदस्यांना विविध बदलांबाबत प्रशिक्षित करून ज्ञान संवर्धनासोबत जागरूक करण्याचा परिषदेचा मुख्य उद्देश असल्याचे क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष सुनील कोतवाल यांनी प्रास्ताविक क रताना सांगितले.बदलत्या परिस्थितीत सफल व्यवसायासाठी या परिषदेतून मिळालेल्या माहितीचा निश्चितच लाभ होईल. त्यासोबतच नाशिकला दिलेल्या यजमान पदामुळे नाशिकची ओळख महाराष्ट्राच्या अन्य शहरातून आलेल्या बांधकाम व्यावसायिकांना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या परिषदेत महाराष्ट्रातील विविध ५१ शहरांतील सुमारे १००० हून अधिक बांधकाम व्यावसायिक सहभागी झाले असून शनिवारी दुपारपर्यंतही परिषद चालणार आहे.विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शनक्रेडाई महाराष्ट्र महाकॉन या राज्यस्तरीय परिषदेत दुसºया सत्रात विविध तज्ज्ञ वक्त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले. यात टायटल इन्शुरन्स या विषयावर आय. पी. इनामदार यांनी मार्गदर्शन केले. तर आरती हरभजनका, दिलीप मुगलीकर, पंकज कोठारी व सचिन कुलकर्णी यांनी पंतप्रधान आवास योजनेमध्ये पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप या महत्त्वाच्या विषयावर सखोल चर्चा केली. ऋ ग्वेद देशपांडे यांनी रिअल इस्टेटमधील मार्केटिंग बाबतचे अनुभवाचे कथन करताना बांधकाम व्यावसायिकांना मार्केटिंगच्या टिप्स दिल्या. अंकुर पंधे यांनी परवडणारी घरे या विषयावर मत मांडले. तर अभिजित प्रधान यांनी ‘मास कन्स्ट्रक्शन’ विषयावर मार्गदर्शन केले. आर्थिक बाबींसंदर्भात सी. ए. विनीत देव, रेरा आणि आर्थिक शिस्त विषयांवर कर्नल अजय कुमार सिंग, ‘प्लॉटिंग : एक नवे व्यवसाय विश्व’ विषयावर आर्कि टेक्ट रवि कदम, गौतम संचेती, किरण चव्हाण व शांतिलाल कटारिया यांनी मार्गदर्शन केले.व्हिसल ब्लोअर व्हा!४बिगर नोंदणीकृत व्यावसायिकांविरोधात नोंदणीकृत व्यावसायिकांनी व्हिसल ब्लोअर व्हावे, त्यांची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याचे आश्वासन चॅटर्जी यांनी केले. त्याचप्रमाणे महारेराच्या नियमांनुसार बांधक ाम केल्यास त्याचा फायदा ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिक दोघांनाही असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
रेरामुळे व्यवसायाचा सन्मान उंचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 1:27 AM
नाशिक : महाराष्ट्रातील बहुसंख्य बांधकाम व्यावसायिकांनी रेरा कायद्यास सकारात्मक प्रतिसाद दिला असून, या कायद्यामुळे बांधकाम व्यवसायातील पारदर्शकता वाढली आहे. रेरा कायद्याचा मूळगाभाच पारदर्शकता असल्याने या कायद्यामुळे बांधकाम व्यावसायिकांचा सन्मान उंचावला असून, या व्यवसायाला खऱ्या अर्थाने उद्योगाचा दर्जा प्राप्त होत असल्याचे प्रतिपादन महारेराचे अध्यक्ष गौतम चॅटर्जी यांनी केले आहे.
ठळक मुद्देगौतम चटर्जी : महाकॉन-२०१८च्या शुभारंभप्रसंगी प्रतिपादन