शासनाच्या आरोग्य विभागात वर्ग २ वैद्यकीय अधिकाऱ्यांची २२४९, तर वर्ग- १ डॉक्टरांची विविध संवर्गातील ८९९ पदे रिक्त आहेत. एकूणच राज्यात आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. ३१ मे २०२१ रोजी शासनाच्या आरोग्यसेवेतून सुमारे ५०० पर्यंत डॉक्टर सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे सध्या परिस्थितीत ३६४८ पदे रिक्त राहणार असल्याने मे २०२१नंतर आरोग्य विभागात मोठी समस्या निर्माण होईल. शासन एम.बी.बी.एस. डॉक्टरांसाठी भरतीप्रक्रिया राबवत असते. परंतु नवीन डॉक्टर शासनाकडे रुजू होत नसल्याचे चित्र दिसते. अल्पप्रमाणात सेवेत दाखल झालेले वैद्यकीय अधिकारी यांच्या वरील अतिरिक्त कामाचा ताण पडतो. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी यांच्या अनुभवाचा उपयोग गरीब आदिवासी रुग्णांना व्हावा यासाठी वैद्यकीय अधिकारी यांचा सेवावृत्तीचे वय ६५ करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:15 AM