सिन्नर : दुष्काळात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात करून घ्यावीत, पानी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेने ही कामे करण्याची संधी चालून आली असल्याचे प्रतिपादन आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले.सिन्नर पंचायत समितीच्या सभागृहात पानी फाऊंडेनशच्या ‘जलसंधारण ते मनसंधारण’ या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार वाजे बोलत होते. तहसीलदार नितीन गवळी, सभापती भगवान पथवे, उपसभापती जगन्नाथ भाबड, गटनेते संग्राम कातकाडे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, पंचायत समिती सदस्य सुमन बर्डे, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, डुबेरेचे माजी सरपंच रामनाथ पावसे, ठाणगावचे माजी सरपंच नामदेव शिंदे, अशोक डावरे, तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे, पाणी फाऊंडेशनच्या सुषमा मानकर, प्रवीण डोनगावे, नागेश गरड आदींसह तालुक्यातील विविध गावांतून आलेले सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. आमदार वाजे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.स्पर्धेत सहभागासाठी तालुक्याची दुसऱ्यांदा निवड झाली आहे. पहिल्या वर्षी चांगली कामे करणाºया गावांनी राज्यपातळीचे उद्दीष्ट ठेवणे अपेक्षित आहे. परंतु, जी गावे यापासून दूर राहिली अशा गावांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात यावे. त्यामुळे सर्वच गावांत ही चळवळ पोहोचू शकेल. जलयुक्तमध्ये जिल्ह्यापैकी तालुक्यात सर्वाधिक ४४ टक्के काम झाले आहे.
पानी फाऊंडेनशच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे उभी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 5:44 PM