नाशिक - देशात 2014 पासून हिंदुत्ववाद्यांची सत्ता आहे. हिंदू सत्तेबाहेर आहेत. या हिंदुत्ववाद्यांना सत्तेतून हटवून हिंदूंना सत्तेवर आणायचे आहे, अशा शब्दात काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारवर हल्ला चढवला. राहुल गांधींच्या या वक्तव्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी खिल्ली उडवली आहे. देशांत हिंदूंचं सरकार आणायचं आहे, मग आता काय आफ्रिकन लोकं राज्य करत आहेत का? असा मिश्कील सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे.
आम्हाला घाबरवले जाऊ शकत नाही. आम्ही मृत्यूला भीत नाही. हिंदुत्ववाद्यांना फक्त सत्ता हवी आहे, सत्य नाही. त्यांचा मार्ग सत्याग्रह नसून 'सत्ता'ग्रह आहे. हिंदू आपल्या भीतीचा सामना करतो, तो शिव शंकराप्रमाणे आपली भीती प्राशन करून टाकतो. मात्र, हिंदुत्ववादी भीतीत जगत असतात, असे राहुल गांधींनी म्हटले होते. राहुल गांधींच्या या हिंदुत्त्वावादी विधानावरुन राज ठाकरेंनी काँग्रेसला टोला लगावला आहे.
देशात शरद पवार यांच्या नेतृत्त्वात आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसला बाजूला ठेवायच असं कधी म्हणतात, तर शिवसेना म्हणते काँग्रेसशिवाय भाजपला दूर ठेवता येत नाही, यासंदर्भात राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना राज ठाकरेंनी राहुल गांधींच्या राजस्थानच्या सभेतीली विधानाचा उल्लेख केला. मी आत्ता राहुल गांधींचं स्टेटमेंट वाचलं, मी हिंदू आहे पण हिंदुत्ववादी नाही. या देशामध्ये हिंदूंचं राज्य आलं पाहिजे, असं राहुल गांधी म्हणतात. मग, आत्ता काय आफ्रिकन लोकं राहतात का येथे, कोण करतंय राज्य?, असे म्हणत राज ठाकरेंनी राहुल गांधींच्या विधानाची खिल्ली उडवली.
एसटीमधील भ्रष्टाचार थांबवाएसटी कर्मचाऱ्यांना समजून घेतले पाहिजे. सगळ्या संघटना बाजूला करुन कर्मचारी एकवटले आहेत. एसटीची परिस्थिती पाहिली तर कशाप्रकारे चालक ती बस चालवतात हे कळेल. एसटीचं खासगीकरण करण्यापेक्षा चांगल्या व्यवस्थापकीय कंपन्या का नेमल्या जात नाहीत? एसटीमधला भ्रष्टाचार थांबला तर कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळतील. एसटी कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर दिले जात नाहीत.
2014 पासून हिन्दुत्ववादी सत्तेवर, त्यांना हटवायचे आहे राहुल म्हणाले, हिंदुत्ववाद्यांना सत्याशी काही देणे-घेणे नाही. हिंदू सत्याच्या शोधात कधीच झुकत नाही. पण हिंदुत्ववाद्याच्या मनात नेहमीच द्वेष भरलेला असतो. कारण त्याच्या मनात भीती असते. तुम्ही सर्व हिंदू आहात. हिंदुत्ववादी हे सत्तेचे भुकेले आहेत. 2014 पासून हिंदुत्ववादी सत्तेत आहेत, हिंदू सत्तेबाहेर आहेत. आपल्याला या हिंदुत्ववाद्यांना हटवून, हिंदूंना सत्तेत आणायचे आहे. याच बरबोर, हिंदुत्ववाद्यांना फक्त सत्ता हवी आहे, सत्य नाही. त्यांचा मार्ग सत्याग्रह नसून 'सत्ता'ग्रह आहे. हिंदू आपल्या भीतीचा सामना करतो, तो शिव शंकराप्रमाणे आपली भीती प्राशन करून टाकतो. पण, हिन्दुत्ववादी भीतीत जगत असतात.