नाशिक (सुयोग जोशी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्ताने अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज सायंकाळपासून (दि.7) शहरात आगमन होणार आहे. वर्धानपन दिनाची गेल्या काही दिवसांपासून पक्षाकडून जय्यत तयारी सुरु आहे. दरम्यान राज ठाकरे यांचे गुरुवारी सायंकाळी पाथरडी फाटा येथे दाखल होणार असल्याने मनसैनिकांकडून त्यांचे जोरदार स्वागत केले जाणार आहे.
पक्षाला पुन्हा गतवैभव मिळ्वून देण्याच्या दुष्टीने या वर्धापन दिनाकडे पाहिले जात आहे. शुक्रवारी (दि.8) सकाळी नऊ वाजता राज ठाकरे यांच्या हस्ते काळाराम मंदिरात जाउन महाआरती करणार आहे. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी नउ वाजेला वर्धापन दिन कार्यक्रमाला सुरवात होणार आहे. यानिमित्ताने मनसेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी, कार्यकर्ते दाखल होणार आहेत. राज ठाकरे यांच्या उपस्थित वर्धापन दिन होत असल्याने पक्षाकडून शहर भगवेमय केले आहे. राजगड कार्यालयासह शहरातील महत्वाचे चौक मनसेच्या ध्वजाने सजविण्यात आले आहेत. कार्यकर्त्यात कमालीचा उत्साह आहे.-सुदाम कोंबडे, शहराध्यक्ष, मनसे