संजय पाठक, नाशिक- त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान येत्या गुरूवारी (दि.२०) होणार आहे. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटूंब उपस्थित राहणार असून ते पालखीची पुजा करून काही वेळ वारीत सहभागी होणार आहेत. पालखीत शतपावली केल्यानंतर ते बारा ज्योर्तिलींगापैकी एक श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन ते नाशिकला परतणार आहेत. नाशिकच्या संत निवृत्तीनाथ दिंडी सोहळ्यास प्रथमच राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. हा पूर्णत: धार्मिक दौरा असून स्वत: राज ठाकरे यांनीच या धार्मिक साेहळ्यासाठी उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती मनसेचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी दिली.
नाशिक मध्ये यासंदर्भात मनसेची पूर्वतयारी बैठक देखील पार पडली. संत निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी २० जुलै रोजी पंढरपूर येथे रवाना होणार असून १७ जुलै राेजी पंढरपूरला दिंडी पोहाेचल. त्या दृष्टीने सर्व तयारी सुरू असून आता दिंडीतील पालखीच्या पुजनासाठी थेट राज ठाकरे हेच उपस्थित रहाणार आहेत.