शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

राज ठाकरे २२ सप्टेंबरपासून पुन्हा नाशिकच्या दौऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 4:20 AM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कृष्ण कुंजवर मंगळवारी (दि.७) नाशिक जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष तसेच सहाही विभाग अध्यक्षांसोबत ...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कृष्ण कुंजवर मंगळवारी (दि.७) नाशिक जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष तसेच सहाही विभाग अध्यक्षांसोबत आगामी नाशिक मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना बांधणी तसेच शाखा अध्यक्ष नेमणुकीसंदर्भात बैठक घेतली.

यावेळी ठाकरे व मनसेचे नेते यांनी विभाग अध्यक्षांबरोबर प्रथम वेगवेगळी व नंतर एकत्रितपणे भेट घेऊन पक्ष बांधणीबाबत सविस्तर चर्चा केली. येत्या २१ सप्टेंबर राेजी युवा नेते अमित ठाकरे सर्व प्रमुख नेते आणि २२ तारखेपासून स्वतः राज ठाकरे नाशिक भेटीवर येणार आहे. याच दिवशी सर्व नूतन शाखा अध्यक्षांच्या नेमणुका व २३ तारखेला सर्व सहाही विभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्षांचा एकत्रित मेळावा होणार होणार आहे, अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांनी दिली.

मंगळवारी झालेल्या बैठकीस अमित ठाकरे तसेच बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, संदीप देशपांडे, अविनाश जाधव व योगेश परुळेकर, शहराध्यक्ष अंकुश पवार, विभाग अध्यक्ष भाऊसाहेब निमसे, सत्यम खंडाळे, रामदास दातीर, नितीन साळवे, विक्रम कदम व योगेश लभडे आदी उपस्थित होते.