शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

राज ठाकरे यांच्या ड्रीम प्रोजेक्टमधील बंद पडलेला ‘लेझर शो’ उद्यापासून होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 2:48 PM

वनौषधी उद्यान : वनविभागामार्फत आता ‘कथा अरण्याची’

ठळक मुद्दे टाटा ट्रस्टच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या या लेझर शोचे कंत्राट दि. ३१ डिसेंबरला संपुष्टात आल्यानंतर गेल्या महिनाभरापासून शो बंद होताशोची जबाबदारी स्वीकारण्यास वनविभागाचे अधिकारी पुढे येत नव्हते

नाशिक : पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या नेहरू वनोद्यानातील बॉटनिकल गार्डनमध्ये गेल्या महिनाभरापासून बंद पडलेला ‘कथा अरण्याची’ हा प्रकाश योजनेचा आविष्कार दर्शविणारा लेझर शो गुरुवार, दि. १ फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू होणार असून, वनविभागामार्फत ‘कथा अरण्याची’ या ‘शो’ची जबाबदारी पार पाडली जाणार आहे. महापालिका आयुक्तांसमवेत वनविभागाच्या अधिका-यांची बैठक होऊन त्यात हा निर्णय घेण्यात आला.मागील पंचवार्षिकमध्ये मनसेच्या सत्ताकाळात राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून वनविभागाच्या नेहरू वनोद्यानात बॉटनिकल गार्डन साकारण्यात आले आहे. या उद्यानात वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून देणारा ‘कथा अरण्याची’ हा प्रकाश योजनेचा आविष्कार दर्शविणारा लेझर शो सादर केला जातो. सदर लेझर शो हे या गार्डनचे प्रमुख आकर्षण असल्याने सायंकाळी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या या लेझर शोचे कंत्राट दि. ३१ डिसेंबरला संपुष्टात आल्यानंतर गेल्या महिनाभरापासून शो बंद होता. सदर शोची जबाबदारी स्वीकारण्यास वनविभागाचे अधिकारी पुढे येत नव्हते. वनविभागाला आर्थिकदृष्ट्या ते परवडणारे नसल्याचे सांगितले जात होते. करारनाम्यानुसार, वनविभागाने त्याची जबाबदारी स्वीकारायला हवी होती. त्यामुळे महिनाभरापासून शो बंद पडलेला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण आणि वनविभागाचे अधिकारी यांच्यात मंगळवारी (दि. ३०) बैठक झाली. यावेळी, वनविभागाच्या कर्मचा-यांना शो दाखविण्यासाठी प्रशिक्षित करण्याचा निर्णय झाला आणि येत्या १ फेबु्रवारीपासन लेझर शो पुन्हा एकदा सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे, बॉटनिकल गार्डनकडे पुन्हा एकदा नाशिककरांची पावले वळणार आहेत. ‘कथा अरण्याची’ हा प्रकाश योजनेचा शो विशेष आकर्षण असून, गेल्या चार महिन्यांत सुमारे ८६ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.प्रशिक्षण दिले जाणार येत्या १ फेबु्रवारीपासून पुन्हा एकदा लेझर शो सुरू होत आह. गार्डियन एजन्सीमार्फत महिनाभर वनविभागाच्या कर्मचा-यांना लेझर शो चालविण्याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर, सदर शो ची जबाबदारी वनविकास महामंडळाच्या कर्मचा-यांकडे दिली जाईल. सध्या सदर शो चालविण्यासाठी प्रतिमहिना १ लाख रुपये खर्च येतो. गार्डियन एजन्सीकडेच मेंटेनन्सची जबाबदारी राहणार असून, गरजेनुसार देखभाल-दुरुस्तीची बिले अदा केली जाणार आहेत.- अभिषेक कृष्ण, आयुक्त, मनपा 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाRaj Thackerayराज ठाकरे