लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : डॉ. वसंतराव पवार हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. शिक्षण, सहकार, समाजकारण, साहित्य, संस्कृती क्षेत्रांत त्यांनी भरीव योगदान दिले. मविप्रच्या विस्तारीकरणाबरोबर गुणवत्ता वाढीकडे त्यांनी लक्ष दिले. पारंपरिक शिक्षणाच्या कक्षा रुंदावत त्यांनी व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यांच्या याच कार्यातून आदर्श घेत प्रत्येक कर्मचाऱ्याने काम करीत संस्थेच्या व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. डी. बी. उफाडे यांनी केले.
मविप्रच्या राजर्षी शाहू महाराज तंत्रनिकेतनमध्ये रविवारी डॉ. वसंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. डॉ. डी. बी. उफाडे म्हणाले, डॉ. वसंतराव पवार यांनी समाजकारण, राजकारण व शैक्षणिक क्षेत्रात वेगळी उंची प्राप्त केली; तर डॉ. पवार यांना नावीन्याचा कायम ध्यास असायचा. त्यांनी आयुष्यभर याबाबत तडजोड न करता शिक्षण क्षेत्रात शिस्त, गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसूत्रीचा अवलंब केल्याचे अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. बी. एस. देशमुख यांनी नमूद केले. प्रा. व्ही. आर.
पाटील यांनी प्रास्ताविक केले.
===Photopath===
040421\img-20210404-wa0128.jpg
===Caption===
राजर्षी शाहू महाराज तंत्रनिकेतन मध्ये डॉ.वसंत पवार यांना अभिवादन करताना प्राचार्य डॉ. डी. बी. उफाडे . समवेत प्रा.बी. एस. देशमुख, प्रा.व्ही. आर. पाटील आदी